शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या मूर्तींना ग्लोबल टच

By admin | Updated: August 30, 2015 01:34 IST

सुमारे ७० वर्षांची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती कारखाना उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. येथील गणेशमूर्ती सातासमुद्रापार जात आहेत. ३५ पेक्षा अधिक लहानमोठ्या

- मनोज शेलार, नंदुरबारसुमारे ७० वर्षांची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती कारखाना उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. येथील गणेशमूर्ती सातासमुद्रापार जात आहेत. ३५ पेक्षा अधिक लहानमोठ्या कारखान्यांमधून एक इंचापासून ते २० फूटापर्यंतच्या हजारो मूर्ती येत्या गणेशोत्सवासाठी तयार होऊ लागल्या आहेत. लाखोंची उलाढाल करणारा हा उद्योग सरकारदरबारी मात्र उपेक्षितच आहे.पूर्वी पेणच्या गणेशमूर्र्तींची मक्तेदारी होती. ती मोडीत काढत नंदुरबारच्या मूर्ती उद्योगाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेल्या वर्षी जवळपास ४०० लहान मूर्ती थेट दक्षिण आफ्रिकेत पाठविण्यात आल्या होत्या. यंदाही मागणी आहे.२५ हजारांपेक्षा अधिक मूर्तीनंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे ३० ते ३५ कारखाने आहेत. जून महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात तीन ते चार महिने राबत असतात. पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागीर होते. त्यांच्या कलेमुळे येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. शहरातील कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणाऱ्या मूर्र्तींची संख्या २५ हजारांपेक्षा अधिक आहे.जागेचा अभावमूर्ती कला उद्योगाला स्थानिक स्तरावर फारसा वाव नाही. शासन व प्रशासन दरबारी त्याची दखल घेतली जात नाही. मूर्ती कारखान्यांना वीज, पाणी आणि जागेसाठी झटावे लागते. गल्लीबोळात जेथे जागा मिळेल तेथे कारखाना सुरू करावा लागतो.गुजरात, मध्य प्रदेशातून मागणीनंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातूनदेखील मोठी मागणी आहे. राज्यापेक्षा या गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणाऱ्या मूर्र्तींचे प्रमाण अधिक आहे.गृह उद्योगही नावारूपालानंदुरबारात मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांप्रमाणे मूर्ती तयार करण्याचे घरगुती उद्योगही आहेत. अगदी एका इंचापासूनची मूर्ती तयार करण्याची कला येथे अवगत आहे. सध्या शाडूच्या मूर्र्तींना चांगली मागणी असल्यामुळे शाडूच्या मूर्ती तयार करणारे देखील अनेक जण आहेत. मूर्ती व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. पूर्वी मोजकेच असलेले कारखाने आजच्या स्थितीत दुप्पट, तिप्पट झाले आहेत. परंतु शासन, प्रशासनाकडून येथील उद्योगाला प्रोत्साहन दिले जात नाही. कमीत कमी जागेचा प्रश्न तरी सोडविला जावा अशी अपेक्षा आहे.- नारायण वाघ, मूर्ती कारागीर