शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

By admin | Updated: October 28, 2016 01:45 IST

राज्य शासनाच्या विविध वाड्.मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात प्रभा गणोरकर, रामदास भटकळ, सुहास बहुळकर, प्रेमानंद गज्वी, राजीव तांबे, प्रतिमा

मुंबई : राज्य शासनाच्या विविध वाड्.मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात प्रभा गणोरकर, रामदास भटकळ, सुहास बहुळकर, प्रेमानंद गज्वी, राजीव तांबे, प्रतिमा इंगोले यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिकांना पुरस्कार घोषित झाले आहेत.पुरस्काराचे स्वरुप जास्तीत जास्त एक लाख रुपये आणि कमीत कमी ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कार, त्याचे विजेते आणि त्यांच्या साहित्यकृती अशा - : प्रौढ वाड्.मय ( काव्य) ; कवि केशवसूत पुरस्कार - प्रभा गणोरकर (व्यामोह), प्रथम प्रकाशन (काव्य); बहिणाबाई चौधरी पुरस्कार - इग्नेशिअस डायस (अधांतराला लटकलेल्या आवरणात), नाटक ; राम गणेश गडकरी पुरस्कार - रमेश नाईक (ती एक अहिल्या होती), कादंबरी; हरी नारायण आपटे पुरस्कार - बा.भो.शास्री (झांजर), प्रथम प्रकाशन कादंबरी; श्री.ना.पेंडसे पुरस्कार - नितीन थोरात (सूर्याची सावली), लघुकथा; दिवाकर कृष्ण पुरस्कार - प्रकाश बाळ जोशी (प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा), प्रथम प्रकाशन लघुकथा; ग.ल.ठोकळ पुरस्कार - ऋषिकेश वांगीकर (कथास्तु), ललितगद्य; अनंत काणे पुरस्कार - प्रेमानंद गज्वी (सगुण नगुण), प्रथम पुरस्कार ललितगद्य; ताराबाई शिंदे पुरस्कार - संदेश कुलकर्णी (माँटुकल दिवस).विनोद; श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार - प्रतिमा इंगोले (हॅट्ट्रिक), चरित्र; न.चिं.केळकर पुरस्कार - सुहास बहुलकर (आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर, आत्मचरित्र; लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - डॉ.ऊज्ज्वला सहाणे (प्रेरणा द साऊंड आॅफ सायलेन्स...), समीक्षा/ वाड्.मयीन संशोधन/ सौंदर्यशास्र; श्री.के. क्षीरसागर पुरस्कार - सुधीर रसाळ (मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण), समीक्षा सौंदर्यशास्र; रा.भा.पाटणकर पुरस्कार - राजेंद्र सलालकर (रंगनाथ पठारे यांच्या साहित्यातील स्री दर्शन), राज्यशास्र/समाजशास्र; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - रमेश पतंगे (सामाजिक न्याय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर), इतिहास; शाहू महाराज पुरस्कार - संजीवनी खेर (सर्वसाक्षी), भाषाशास्र/ व्याकरण; नरहर कुरुंदकर पुरस्कार - रामदास भटकळ, मृदुला प्रभुराम जोशी (पॉप्युलर रीतिपुस्तक), विज्ञान व तंत्रज्ञान; महात्मा जोतिराव फुले पुरस्कार - रमेश वरखेडे (सायबर-संस्कृती), शेती व शेतीविषयकपूरक व्यवसाय लेखनासह; वसंतराव नाईक पुरस्कार - डॉ.नितीन मार्कण्डेय (सातत्यपूर्ण आणि भरपूर दुधासाठी माज संकलन तंत्र).अर्थशास्र व अर्थशास्रविषयक लेखन; सी.डी.देशमुख पुरस्कार - डॉ.श्रीराम पेडगावकर (मानवी अर्थशास्र), तत्त्वज्ञान व मानसशास्र; ना.गो.नांदपूरकर पुरस्कार - दिलीप धोंडगे (तात्पर्य). (विशेष प्रतिनिधी)