शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘पी अ‍ॅण्ड टी’ला पाणी द्या

By admin | Updated: April 4, 2017 04:26 IST

शहरातील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.

डोंबिवली : शहरातील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यावर तोडगा काढण्याची विनंती तेथील गंगा सोसायटीतील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांना केली होती. त्यावर म्हात्रे यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना तातडीने जलवाहिनी दुसरीकडे हलवून पाणी देण्यासंदर्भात सूचना दिली आहे. म्हात्रे यांनी सांगितले की, केडीएमसीच्या ई प्रभागाचे पाणीपुरवठा उपअभियंता योगेंद्र राठोड यांनी गंगा सोसायटी परिसरातील सध्याची जलवाहिनी कुठून जाते याची पाहणी केली आहे. मात्र केवळ एका सोसायटीची जलवाहिनी कशी अन्यत्र जोडायची?, असे कारण सांगत राठोड यांच्यासह उपअभियंता एकंडे टाळाटाळ करत असल्याची टीका ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी केली. गाईगोळे म्हणाले की, म्हात्रे सकारात्मक असताना महापालिकेचे अधिकारी डोळेझाकपण का करतात? लोकप्रतिनिधींच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. पण येथे परिस्थिती उलट आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हात्रे प्रयत्नशील असूनही अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव आहे. दरम्यान, आता कुठे मार्च सरला असून, टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत असल्याचे अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे येथील हजारो रहिवाशांना पालिकेच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ही स्थानिक लोकप्रतिनिधींची शोकांतिका आहे. त्यावर तातडीने उपाययोजना होत नसतील तर त्यांनी ठिय्या आंदोलन करावे. रहिवासी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे गाईगोळे म्हणाले. (प्रतिनिधी)>टँकर मिळतोयखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेकडून गंगा सोसायटीला दिवसाआड तर जशी गरज पडेल, तसा एक टँकर मिळत आहे. खासदारांच्या पत्राला तेवढी दाद महापालिकेचे अधिकारी देत आहेत, असे गाईगोळे यांनी सांगितले. म्हात्रे यांच्या भूमिकेबद्दलही रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.