शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दिवस पूर्ण विश्रांती द्या’

By admin | Updated: October 20, 2016 05:49 IST

एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी चालक-वाहकांना एक दिवस पूर्ण विश्रांती देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापक आणि वाहतुक पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना दिले आहेत

मुंबई : प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येवू नये या हेतूने एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी चालक-वाहकांना एक दिवस पूर्ण विश्रांती देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापक आणि वाहतुक पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रकच जारी करण्यात आले आहे. दरवर्षी एसटी महामंडळाचे सुमारे ३000 अपघात होतात आणि त्यापैकी जवळपास ५00 प्राणांतिक अपघात असतात. हे अपघात कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात चालक-वाहकाची भूमिका ही महत्वाची ठरते. एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी विनीत अग्रवाल यांनी मुळ पगार कमी असणाऱ्या चालक-वाहकांना प्राधान्य दिले पाहिजे. परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणत्याही चालक व वाहकाने सहा दिवस काम केले तर त्याला एक दिवस पूर्ण विश्रांती दिली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. तसेच कुठल्याही परिस्थीतीत चालक व वाहकांकडून महिन्याला ८0 तासांपेक्षा जास्त अतिरिक्त काम करुन घेऊ नये याची जबाबदारी आगार व्यवस्थापक व आगारातील संबंधित वाहतुक पर्यवेक्षकीय कर्मचारी यांची राहिल,असेही नमूद करण्यात आले आहे. आगारात चालक,वाहक यांची कमतरता असल्यामुळे डबल ड्युटी नाईलाजाने लावणे आवश्यक असेल तर त्याची आगार व्यवस्थापक यांना पूर्ण माहिती असली पाहिजे की,एका महिन्यात किती कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी द्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक शेड्युल निश्चित करुन ते वेगळे करण्यात यावे आणि त्याचे स्वतंत्र रोटेशन लावावे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)एसटी कामगार सेनेचा विरोधपरिपत्रक प्रशासनाकडून काढले जाते. हे परिपत्रक योग्य नाही. त्याला आमचा विरोध आहे. जर एखादा चालक, वाहक गैरहजर असेल तर अन्य कर्मचाऱ्याला ड्युटी लावताना अनेकदा विचार करायला हवा, याप्रमाणे परिपत्रकातून निर्देश देण्यात आले आहेत. - शिवाजीराव चव्हाण, एसटी कामगार सेना-कार्याध्यक्ष>परिपत्रक योग्यसुरक्षेच्या दृष्टिने हे परिपत्रक योग्य आहे आणि ते अधिकाऱ्यांनी स्विकारले पाहिजे. चालक-वाहकांच्या दृष्टिनेही ते उपयुक्त आहे. - श्रीरंग बरगे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस-सरचिटणीस