शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील बागायतदार, मच्छीमारांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: July 2, 2017 03:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा व शेतकऱ्यांनी संपाच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या उठावापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. आता

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा व शेतकऱ्यांनी संपाच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या उठावापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. आता कोकणातील कमी कर्ज घेणारे शेतकरी, फळ बागायतदार, मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पावसाळी अधिवेशनात आवाज उठवेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जमाफी व निलंबनाच्या प्रश्नावरून संघर्ष यात्रेद्वारे राज्यात जागृती केली. यंदाच्या कर्जमाफी निर्णयात अनेक त्रुटी आहेत. नोटबंदीनंतर भाजपा सरकारने राज्यातील जिल्हा बँकांमधील कोट्यवधी रुपयांच्या नोटा भरून घेण्यास नकार देऊन जिल्हा बँकांची कोंडी केली. मात्र भाजपाच्या ताब्यात असलेल्या अर्बन बँकांना अभय दिले.बँकांमध्ये ८ महिने पडून असलेल्या पैशांवर व्याज मिळावे, असे प्रयत्न आता सुरू आहेत. व्याज दिले नाही तर त्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात न्याय मागितला जाईल, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सत्तेला भाजपा व सेना हे पक्ष गोचिडाप्रमाणे चिकटलेले आहेत. कागदावरील शाई उडून सेना नेत्यांच्या खिशातील राजीनाम्याचे कागद आता कोरे झाले असतील. त्यामुळे मध्यावधीची शक्यता नाही. राजापूरमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला पक्षाचा विरोध आहे. कोकणात रासायनिक कारखाने नकोत. म्हणून आमदारांचे निलंबनकर्जमाफीचा शेतकऱ्यांना नव्हे बँकांना फायदा होतो, असे सांगत कर्जमाफी नाकारणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार अडचणीत येऊ नये, म्हणून राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित केले.