गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले. कविता अनुभवच असतात. प्रत्येक अनुभव कवीकडे चेहरा मागत असतो. त्याचा आविष्कार कविता, गझल किंवा गाण्याच्या रूपात होत असतो. या शब्दात ९ वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या नागपूर संगीत महोत्सव निमित्ताने पाडगावकर यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांच्याकडे आपल्या लेखनाचा प्रवास उलगडला होता.कविता किंवा गाणं कसं सूचतं, ते अजिबात सांगता येणार नाही. एखादी घटना घडते किंवा विशिष्ट असा उत्कट अनुभव येतो, तेव्हा कविता मुळीच सूचत नाही. उलट काहीही संबंध नसताना एक ओळ मनात येते आणि तीच कवितेची सुरुवात ठरते. माझं ‘श्रावणात घननिळा’ हे गाणं असंच अचानक निर्माण झालं आहे. त्यामागची पार्श्वभूमी गमतीशीर आहे. मुंबईत मी एकदा रेल्वेने प्रवास करत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. घाम गळत होता. तितक्यात अचानक एक ओळ कुठून तरी आली. अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही तिचा मला मूड कळला. त्यावेळी प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या श्रीनिवास खळे आणि मी, त्या गाण्याचा मूड व्ही.टी. स्टेशन येईपर्यंत पकडला होता. गंमत अशी, की, ‘श्रावणात घननिळा’ हे गाणे जरी पावसात भिजलेले वाटत असले, तरी ते ऐन घामेजलेल्या दिवसांत तयार झालेले आहे.‘कविता एकट्याने वाचता येते, परंतु गाणं एकट्याने वाचता येत नाही. कविता आणि गाणं यांची तुलनाही करता येत नाही. जीवनातल्या नाना तऱ्हेचे अनुभव माझ्याकडे येतात. ते मला सांगतात की, मला माझा चेहरा दे, मला माझा आवाज दे. प्रत्येक अनुभव त्याची भाषा मागत असतो. असाच कधीतरी एक अनुभव मला येऊन सांगतो की, मला चेहरा दे मला गझल व्हायचंय. तेव्हा तो शुद्ध गझलच असतो. या तिन्ही प्रकारांत भाषेची सर्जनशीलता महत्त्वाची असते’.सन्मान कविवर्यांचा...नागपूर संगीत महोत्सव, तसेच मराठी हास्यकवी संमेलन अशा ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मंगेश पाडगावकर आवर्जून उपस्थित होते.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.
अनुभवांना चेहरा देणे म्हणजे कविता
By admin | Updated: December 31, 2015 04:14 IST