शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने मुलीवर शस्त्राने वार

By admin | Updated: August 1, 2016 22:39 IST

तालुक्यातील चिरणे येथील कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने लग्नास नकार दिल्याने मयुर गिरासे (रा. वरसुस) याने संबंधित विद्यार्थिनी घरी जात असतांना रस्त्यात अडवून

ऑनलाइन लोकमतशिंदखेडा, दि. १ -  तालुक्यातील चिरणे येथील कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने लग्नास नकार दिल्याने मयुर गिरासे (रा. वरसुस) याने संबंधित विद्यार्थिनी घरी जात असतांना रस्त्यात अडवून गळ्यावर व छातीवर धारदार सुऱ्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना शिंदखेडा चिरणे रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. संबंधित युवती ही मंगळवारी सायंकाळी तिच्या मैत्रीणीसोबत रिक्षाने जात होती. त्याचवेळी आरोपीने तिच्यावर वार केला. ही घटना घडली. त्यावेळी चिरणे-कलाणे येथील विनायक बापू पाटील, गोविंद तावडे, दिनेश तावडे व दिनेश नगराळे हे मोटरसायकलने याच रस्त्यावरून घरी जात होते. तेव्हा मयुर गिरासे याने त्याच्या हातातील सुरा त्याचठिकाणी टाकून पळून काढला. ग्रामीण रुग्णालयात दाखल जखमी अवस्थेत संबंधित विद्यार्थिनीला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ. विनय पवार यांनी संबंधित युवतीवर तातडीने उपचार केले. जखमी झाल्यामुळे या युवतीच्या गळ्यावर पाच तर छातीवर तीन टाके टाकण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पोतदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, हवालदार लिंबाळे यांनी संबंधित युवतीचा जबाब नोंदवून घेतला. आरोपीस अटक होत, नाहीतोपर्यंत आंदोलन दरम्यान, जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत कोळी समाजबांधवांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे, देवीदास कोळी व इतर समाजबांधवांनी सहभाग घेतला असून यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणाबाजी देण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक देवीदास भोज व पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत हे आरोपीस अटक करण्यासाठी गेले असून रात्री उशीरापर्यंत त्यास अटक झालेली नव्हती. आणि ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.