शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला बांधून मुलीवर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 20:53 IST

राज्य व देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच सोमवारी अहमदनगर

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १४-  राज्यासह देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारातील हंगा नदीच्या तिरावर एका मुलीचा झाडाला बांधून विनयभंग करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. आपल्या चुलत बहिणीसोबत लघुशंकेसाठी ही शाळकरी अल्पवयीन मुलगी गेली होती. यावेळी अनोळखी तीन बुरखाधारी युवकांनी सोमवारी एका झाडाला बांधून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले. तसेच तिचे कपडे फाडले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरविली आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार या मुली शाळेला सुट्टी असल्याने सकाळी हंगा नदीवर आई व चुलतीसोबत कपडे धुण्यासाठी हंगा नदीवर गेल्या होत्या. त्यानंतर घरी येऊन पुन्हा लघुशंकेसाठी नदीवर गेल्या असता हा प्रकार घडला. हे ठिकाण गावापासून दोन किमी अंतरावर आहे. अत्याचार झालेली मुलगी आठवीत शिक्षण घेत आहे. या मुलीच्या चुलत्यांच्या मोटारसायकलच्या डिकीत एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत ‘दिवाळीनंतर तुमच्या मुली शाळेत पाठविल्यास त्यांचा घातपात करू’ अशी धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच हा प्रकार घडल्यामुळे मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थ चांगलेच संतापले. त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन वागंडे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा छडा लावा, अन्यथा वाडी वस्तीवरील मुली शाळेला कशा जाणार? असा प्रश्न उपस्थित केला. सत्य उजेडात आणणार ....मुलीने दिलेल्या जबाबानुसार अनोळखी आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३२४,३४१ व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आम्ही तपास सुरू केला आहे. सर्व बाजूंनी तपास करून या प्रकरणातील सत्य उजेडात आणणार आहे.- सचिन वागंडे,  पोलीस निरीक्षक बेलवंडी.