शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या कचाट्यातून शाळकरी मुलीने वाचविले स्वत:चे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 21:46 IST

शेतात शेतकाम करीत असतानाच अस्वल दिसल्याबरोबर झाडावर चढून आपले प्राण वाचविण्याचा पराक्रम १३ वर्षीय अश्विनीने केला आहे

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २१ : शेतात शेतकाम करीत असतानाच अस्वल दिसल्याबरोबर झाडावर चढून आपले प्राण वाचविण्याचा पराक्रम १३ वर्षीय अश्विनीने केला आहे. मुलगी झाडावर आणि अस्वल झाडाखाली असा पाठशिवणीचा खेळ १५ मिनिट चालला. हायवेला लागून केवळ १०० फुटावर हा थरार पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली. काही लोकांनी धाडस करुन अस्वलाच्या तावडीतून मुलीला सुखरूप खाली आणले. ही घटना २१ आॅक्टोबर रोजी केळवद शिवारात सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली. चिखली तालुक्यातील केळवद गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर हायवेवर अ‍ॅड.दिपक पाटील यांच्या शेतात काही महिला सोयाबीनचा सरवा जमा करत होत्या. यामध्ये अश्विनी बालू मोरे (वय १३ वर्षे) ही मुलगी सहभागी होती.

तुरीच्या शेतात सरवा जमा करण्याचे काम सुरु असल्याने शेत पूर्णपणे झाकले होते. यावेळी गिताबाई संतोष बरडे, कमलबाई गजानन मोरे या महिलांना पुढून अस्वल येत असल्याचे दिसले. या महिलांनी आरडाओरड करुन अश्विनीस कल्पना दिली. परंतु, तोपर्यंत अस्वल  जवळ आले होते. अश्विनीला एक आंब्याने झाड दिसले, त्यावर ती चढली. तोपर्यंत अस्वल झाडाखाली आले व थांबले. हा थरार १५ मिनिटे चालला. महिला ओरडत रस्त्यावर मदतीच्या उद्देशाने आल्या. तेथून बुलडाणाकडे जात असलेले पोलिस दक्षता पथकाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांना महिलांनी अस्वलाची व मुलगी झाडावर अडकल्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळया घटनेची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक श्वेता खेडेकर यांना दिली. श्वेता खेडकर यांनी तात्काळ वनविभागाने डि.एफ.ओ.भगत यांच्याशी संपर्क केला.

डी.एफ.ओंनी आपला ताफा घेवून २० मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत प्रभाकर वाघमारे यांनी काही लोकांना सोबत घेवून अस्वलाला आरडाओरड करुन हुसकावून लावले व अश्विनी मोरेला सुखरुप वाचविण्यात आले. यानंतर शिवारात सर्च आॅपरेशन राबविण्यात आले. परंतु अस्वल मिळून आले नाही