शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पडघ्यातील गिफ्टचा स्फोट जिलेटीनमुळे?

By admin | Updated: July 31, 2016 03:12 IST

शुक्रवारी गिफ्टच्या बॉक्समधील बाटलीचा स्फोट झाल्याने त्यामागचे कारण शोधण्यासाठी बॉम्बशोधक, श्वान पथक आले होते.

पडघा/भिवंडी : पडघ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खालिंगमध्ये शुक्रवारी गिफ्टच्या बॉक्समधील बाटलीचा स्फोट झाल्याने त्यामागचे कारण शोधण्यासाठी बॉम्बशोधक, श्वान पथक आले होते. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. अद्याप तरी स्फोटामागील गूढ कायम आहे. या घटनेनंतर खालिंग गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. या बाटलीत द्रवस्वरूपातील जिलेटीन होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खालिंग गावात जीवन आणि अजित घरत यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. त्याच्या दुचाकीला अनोळखी व्यक्तीने प्लास्टिक पिशवी लावलेली होती. पिशवीत असलेल्या खोक्यावर ‘अजितसाठी स्पेशल गिफ्ट असून फक्त हे गिफ्ट तूच उघड’ असे लिहिले होते. त्याने हे गिफ्ट न उघडता घरीच ठेवले होते. कुतूहलापोटी अजितची आई नंदा ऊर्फ रेखा यांनी गुरुवारी रात्री बॉक्स उघडला. त्यातील बाटलीचे झाकण उघडले असता अचानक स्फोट झाला. यात त्यांचा हात पंजापासून वेगळा झाला. त्यांच्या डोळ्यालाही इजा झाली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, त्याच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. ग्रामस्थ त्यांच्या घराकडे धावले. नंदा जखमी झाल्यामुळे त्यांना वेदान्त रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने केईएममध्ये हलवले. घटनेची माहिती शुक्रवारी उशिरा पडघा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. बाटलीतील द्रव पदार्थाचा स्फोट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी, वार्ताहर)।अजितला मारण्याचा हेतू?हे गिफ्ट अजितच्या गाडीला कुणी लावले, स्फोटक द्रव्य ठेवण्यामागील हेतू काय, हे द्रव्य कुठून आणले, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. अजितच्या चौकशीतूनच नेमका प्रकार उघड होईल. स्फोट करून अजितला मारण्याचा उद्देश होता की, घाबरवण्याचा हेतू होता, या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसली तरी लवकरच आरोपींना पकडू, अशी माहिती पडघा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भास्कर पुकले यांनी दिली.