शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

पॅकेजचे पैसे मिळण्यासाठी आॅगस्ट उजाडणार

By admin | Updated: June 11, 2015 00:44 IST

केंद्राचे साखर उद्योगाला कर्ज : साखर कारखान्यांची वाट बिकटच; तज्ज्ञांनी व्यक्त केल्या शक्यता

विश्वास पाटील - कोल्हापूर -केंद्र शासनाने बुधवारी देशातील साखर उद्योगासाठी बिनव्याजी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून, त्यातील महाराष्ट्राच्या वाट्याला १८५० कोटी रुपये येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या पातळीवरील सूत्रांनी दिली; परंतु हे पैसे कारखान्यांना मिळण्याची वाट बिकट असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आॅगस्ट उजाडण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे.यंदाच्या हंगामात देशात २८ कोटी टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातील महाराष्ट्राचा वाटा नऊ कोटी टनांचा आहे. याचा अर्थ एक-तृतीयांश साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे त्या हिशेबाने राज्याला केंद्राच्या पॅकेजमधील सुमारे दोन हजार कोटी रुपये मिळतील, अशी शक्यता होती; परंतु आता १८५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम देतानाही केंद्र शासनाने कारखान्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा केला आहे. कारखान्यांनी आता त्यांची थकीत देण्यापैकी (ती किती तारखेपर्यंतची याचीही स्पष्टता नाही.) किमान पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी अदा करावी. ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली, त्यांची यादी केंद्र शासनाकडे जमा झाल्यावर शासन उर्वरित ५० टक्क्यांची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या थेट जनधन खात्यावर जमा करणार आहे. या रकमेचे व्याज ६०० कोटी रुपये होईल. तेवढीच रक्कम केंद्र शासन साखर विकास निधीतून देणार आहे. पॅकेजची रक्कम म्हणजे कर्ज आहे. ते कारखान्यांना लगेच पुढील वर्षी परतफेड करायचे आहे. जूननंतर कारखान्यांनी शेतकऱ्यांची यादी दिल्यानंतर केंद्र शासनाच्या पातळीवरील कार्यवाही होऊन पैसे खात्यावर जमा होण्यास आॅगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.ही रक्कम मिळण्यात महत्त्वाच्या दोन-तीन गोष्टी अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. एक तर थकीत देणी देण्यासाठी कारखान्यांकडे आता एक रुपयाही नाही म्हणून तर सगळी ओरड सुरू आहे. त्यामुळे थकीत देण्यांपैकी पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना देणार कोठून, हाच कळीचा मुद्दा आहे. ही रक्कम जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत पुढील पन्नास टक्के कर्जाची रक्कम मिळणार नाही. याचा अर्थ बहुतांश कारखान्यांना या कर्ज पॅकेजचा लाभ मिळणार नाही. या रकमेची लगेच पुढील वर्षी परतफेड करायची आहे. गेल्या वर्षी केंद्र शासनाने दिलेल्या पॅकेजची वसुली पुढील वर्षी सुरू होत आहे. यंदाच्या हंगामात ऊसबिलेही देता आलेली नाहीत. त्याचे ओझे डोक्यावर असताना तोपर्यंत पुढील वर्षी हे कर्ज फेडणार कशातून? अशी विचारणा कारखानदारीतून होऊ लागली आहे.