शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात प्रभावी आरोग्यसेवा मिळावी

By admin | Updated: August 13, 2014 00:50 IST

ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे सदैव दुर्लक्ष होत असते. शिवाय, ग्रामीण व दुर्गम भागात आजही प्रभावी आरोग्यसेवा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली

अमोल देशमुख : हर्ड फाऊंडेशनच्यावतीने कन्हान येथे आरोग्य शिबिरपारशिवनी : ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे सदैव दुर्लक्ष होत असते. शिवाय, ग्रामीण व दुर्गम भागात आजही प्रभावी आरोग्यसेवा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, असे प्रतिपादन हर्ड फाऊंडेशनचे प्रबंध संचालक डॉ. अमोल देशमुख यांनी केले. कन्हान येथे हर्ड फाऊंडेशनच्यावतीने आरोग्य जनजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्य राजेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून इंदरसिंंग जम्बे, यादवराव कुंभलकर, संजय महल्ले, रंगराव ठाकरे, एकनाथ महल्ले, नारायण ठाकरे आदी उपस्थित होते.डॉ. अमोल देशमुख हे ग्रामीण भागातील गरीब व दुर्लक्षित नागरिकांपर्यंत प्रभावी आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात, असे प्रतिपादन राजेश यादव यांनी केले. या शिबिरात दोन हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून, औषधोपचारही करण्यात आले. रुग्णांनी आरोग्य तपासणी करून संदर्भित सेवेचा लाभ घेतला. या शिबिरात एन.के.पी.साळवे वैद्यकीय महाविद्यालय, लता मंगेशकर हॉस्पिटल, औषधीशास्त्र महाविद्यालय येथील मेडिसीन, सर्जरी, अस्थिरोग विभाग, नेत्र तपासणी, त्वचा, कान-नाक-घसा, क्षयरोग, छातीचे रोग, बालरोग, स्त्रीरोग, भौतिकोपचार, दंतरोग आदी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा प्रदान केली.यावेळी कन्हान, कांद्री, गोंडेगाव-टेकाडी, खेडी-खोपडी, वराडा, सत्रापूर, वाघोली, साटक, डुमरी (खुर्द), डुमरी (रेल्वे), बनपुरी, घाटरोहणा, जुनी कामठी येथील दोन हजार रुग्णांची विनामूल्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. नर्सिंग कॉलेजसह २०० कर्मचारी शिबिरात सहभागी झाले होते.डोळे, शारीरिक व्याधी रोग, सांधेदुखी, दंतरोग, कुपोषित बालक, चर्मरोग, कमी ऐकू येणे यासह अन्य व्याधींवर उपचार करण्यात आले. यातील एकूण १३९ रुग्णांना संदर्भसेवा म्हणून नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेण्यास शिफारसपत्र दिले. याशिवाय ५२ रुग्णांची मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. ६२ रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले. ८१ रुग्णांची शर्करा तपासणी, ७२ रुग्णांची इलेक्ट्रोपॅथी, आठ रुग्णांवर सामान्य शस्त्रक्रिया, सात रुग्णांच्या दंत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी माजी सभापती देवीदास जामदार, डॉ. वर्मा, मिलिंंद वाघधरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन हर्ड फाऊंडेशनची प्रशंसा केली. (तालुका वार्ताहर)