शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गौताळ््यात दरोडेखोरांचा हैदोस

By admin | Updated: August 20, 2015 00:33 IST

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी रात्री गौताळा अभयारण्यात फिल्मी स्टाईल हैदोस घातला. जंगलातील दोन मोठी झाडे कन्नड - पिशोर रस्त्यावर टाकून

कन्नड (जि. औरंगाबाद) : सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी रात्री गौताळा अभयारण्यात फिल्मी स्टाईल हैदोस घातला. जंगलातील दोन मोठी झाडे कन्नड - पिशोर रस्त्यावर टाकून त्यांनी सहा वाहने लुटली. त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावरही त्यांनी हल्ला केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका पोलिसासह पाच जण जखमी झाले. पोलिसांचा आणखी फौजफाटा येत असल्याची चाहूल लागताच ही टोळी पसार झाली. कन्नड-पिशोर-सिल्लोड रस्ता अभयारण्यातून जातो. कन्नडकडून पिशोरकडे जाताना चंदन नाल्याजवळील वळणावर लुटीचा प्रकार घडला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी वळण रस्त्यावर दोन झाडे तोडून टाकली. आधी त्यांनी ट्रकवर दगडफेक केली. चालकाला मारहाण करून ऐवज लुटला. पाठोपाठ मेटॅडोर, ट्रक, जीप व कारही दरोडेखोरांनी अडविली. जीपमधील महिलांना बेदम मारहाण करीत त्यांचे दागिने लुटले. इतर वाहनांतील पुरुषांनाही बेदम मारहाण केली. दरोडेखोरांचा हैदोस सुरू असतानाच हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका जात असताना दूरवरुनच चालक संतोष बोडखे यांना रुग्णवाहिकेच्या प्रकाशझोतात रस्ता अडवून लुटालूट सुरू असल्याचे दिसले. त्यांनी गाडीचे लाईट बंद करून वाहन मागे वळविले. रुग्णवाहिकेला पाहताच दरोडेखोरांनी तिच्या दिशेने दगडफेक केली. त्यात रुग्णवाहिकेची काच फुटली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून तेथून वाहनासह पळ काढला आणि कन्नड पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर गस्ती पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांचे पथक तेथे आले. त्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर जीप उभी केली. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केल्यानंतर त्यांनी कन्नड पोलीस ठाण्यातून अधिक कुमत मागविताच दरोडेखोर पसार झाले. (प्रतिनिधी)