शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

कर्जतमध्ये उत्साहात गौरीपूजन

By admin | Updated: September 10, 2016 02:28 IST

तालुक्यातील प्रत्येक गावात बहुतांश घरांमध्ये गौरी पूजन केले जाते.

कर्जत : तालुक्यातील प्रत्येक गावात बहुतांश घरांमध्ये गौरी पूजन केले जाते. यंदा तालुक्यात २६०७ गौरींचे पूजन करण्यात आले. गौरी सणासाठी आलेल्या माहेरवाशिणींनी नववधू, सुवासिनींनी गौरीचे पूजन करून ओवसा घेतला. हा क्षण सुवासिनींसाठी अत्यंत आनंदाचा व महत्वाचा समजला जातो. गैरी-गणपतीमुळे घरा घरांमध्ये प्रसन्न वातावरण आहे. गुरु वारी पहाटे गौरीची फुले म्हणजेच कचोऱ्याची फुले आणण्यासाठी घरीतील पुरूष मंडळी रानात, डोंगरात जातात तेथून टोपलीत ही साधारण गुलाबी रंगाची फुले सायंकाळच्या सुमारास घरी आणतात. त्यानंतर महिला गौरीच्या पूजेची तयारी रात्रीपासूनच करतात. तेरड्याच्या रोपांसह असलेल्या फुलांनी सजविलेल्या गौरीला साडी नेसवून खुर्चीवर बसविले जाते. त्यानंतर गौरीचा मुखवटा लावून त्या मुखवट्याला दागिन्यांनी सजविले जाते. पुठ्ठयाने बनविलेल्या हातांमध्ये बांगड्या घातल्या जातात व गौरीची फुले व्यवस्थित मांडली जातात. गौरी सणासाठी विशेष करून आपल्या बहिणीला भाऊ सूप घेऊन येतो तसेच चोळी बांगडीसाठी अवर्जून पैसे देतो. ही परंपरा अजूनही खेड्या पाड्यात पहावयास मिळते.गौरी पूजन झाल्यानंतर साधारण दुपारच्या सुमारास गौरीचा ओवसा सुवासिनी घेतात यावेळी नवीन सुपाचा वापर केला जातो. पिठाने तयार केलेल्या दिव्याने गौरीला ओवाळले जाते. बहुतांश गावांमध्ये अशा प्रकारे गौरी पूजन केले जाते. काही ठिकाणी गौरीची मूर्ती आणून पूजन केले जाते. उभ्या गौरी सुध्दा असतात. यावेळी विविध अभूषणांनी सजलेल्या गैरी ठिकठिकाणी पहावयास मिळाल्या. (वार्ताहर)नाच-या गौरींचे आकर्षणरेवदंडा : गणेश उत्सवात गौरीचे आगमन हा सण महिलांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असतो. या गौरीचे प्रथे प्रमाणे वाजत गाजत आगमन झाले. शुक्रवारी या गौरीचे पूजन झाले. रेवदंडामधील नाच-या गौरी या उभ्या हातापायांच्या असतात त्यामुळे त्यांचे वेगळे आकर्षण आहे. शुक्रवारी गैरीला जरीदार साडीने सजवून विविध आभूषणे, फुलांनी सजवलेल्या गौरी शनिवारी (१० सप्टेंबर) सांयकाळी सातच्या सुमारास पारनाका भागात नाच-या गौरीचा कार्यक्र म पाहण्यासारखा असतो. नाच-या गौरीची सुमारे १३० वर्षाची परंपरा आहे.सुखी संसारासाठी सौभाग्यवतींनी घातले साकडेअलिबाग : जिल्ह्यात गुरुवारी घरोघर आलेल्या १४ हजार ६४७ गौरीचे शुक्रवारी विधीवत पूजन के ले.यावेळी नवविवाहीत सौभाग्यवतींंनी आपल्या गौरीच्या ओवशांची सूपे घरातील ज्येष्ठांना वाण देवून गौरीला सुखी संसारासाठी साकडे देखील घातले. शहरी आणि ग्रामिण भागात घरोघरी गौरीचे आगमन झाले असून तिची पूजा, तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचे नैवेद्यानाने उत्साहपूर्ण वातावरणात तिचे स्वागत करण्यात आले. शुक्र वारी गौरीच्या महानैवेद्याचा दिवस असून घराघरात गोडधोडाचे पदार्थ, सोळा भाज्यांचे नैवेद्य दाखिवण्यात आले. यंदा गौराईचे आगमन पुर्वा नक्षत्रावर झाल्याने गौरीचे हौसे(ओवसे) केले जातात. फराळाचे पदार्थ, विड्याची पानं, सुपारी, नारळ सुपात घेऊन नवी नवरी वाण घरोघरी वाण घेऊन जात होत्या. शुक्र वारी घरोघरी गौरींचे पूजन व आरती करण्यात आली. गौरीला आल्यापाल्याची भाजी, भाकरी, दहीभात व अळूच्या वडीचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री महिला एकत्र जमून गौरी गीतांनी रात्र जागवली.