शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भावी अधिकाऱ्यांचा रंगणार गौरव सोहळा

By admin | Updated: August 24, 2015 01:25 IST

भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न बाळगलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न बाळगलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमतच्या वतीने केला जाणार आहे. हा सोहळा बुधवारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ९ ते १ या वेळेत रंगणार आहे. यूपीएससी परीक्षेत प्रथम आलेली ईरा सिंघल, दुसरी आलेली रेणू राज आणि तिसरी आलेली निधी गुप्ता या टॉपर्सशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी यावेळी मिळणार आहे. एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमततर्फे आयोजित या आगळ््यावेगळ््या सोहळ््याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या एकमेव गौरव सोहळ््यासाठी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक व भारताचे माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रशासन स्वच्छ, पारदर्शी व गतिमान असेल तर विकासात्मक योजना ठरावीक कार्यकाळात पूर्ण होऊन भारताचा सर्वांगीण विकास साधला जाईल. त्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमततर्फे हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. गौरव सोहळ््यात देशभरातील यशवंत उपस्थित राहणार असल्याने त्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे ठरणार आहे.