शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मरेच्या फेऱ्यांना फाटकांचा फटका

By admin | Updated: July 10, 2015 03:08 IST

मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे. फाटकांमुळे लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वर्षभरात वाढले असून, त्यामुळे लोकल गाड्यांबरोबरच प्रवाशांनाही लेटमार्क लागत आहे. लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्नही फोल ठरत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील मेन लाइनचा उपनगरापर्यंतचा पसारा सीएसटी ते कल्याण, कर्जत, खोपोली, कसारा आणि हार्बरवर नवी मुंबईपर्यंत आहे. मेन लाइनवरील कळवा, दिवा, ठाकुर्ली हे तीन तर हार्बरवर शिवडी आणि चुनाभट्टी हे दोन फाटक असून, याच फाटकांमुळे लोकल गाड्यांना मोठा फटका बसत आहे. हे फाटक २४ तासांत जवळपास १00 वेळा उघडतात. वर्षभरापूर्वी फाटक उघडण्याचे प्रमाण हे कमी होते. मात्र स्थानिकांच्या मागणीनुसार फाटक उघडण्याचे प्रमाण वाढले आणि त्याचाच फटका बसत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एक वर्षापूर्वी दिवसाला ३0 लोकल फेऱ्या रद्द होत होत्या. मात्र फाटक उघडण्याचे प्रमाण वाढल्याने आता दिवसाला ७0 ते ८0 लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. हे पाहता वर्षभरापूर्वी ९00 लोकल फेऱ्या रद्द होत असताना आता सुमारे २ हजारपेक्षा जास्त फेऱ्या रद्द होत आहेत.