शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत गॅस्ट्रोचे रुग्ण दोनशेपल्ल्याड

By admin | Updated: July 31, 2016 01:45 IST

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णांचा आलेख दोनशेच्या वर सरकला आहे. तर मलेरियाच्या रुग्णांनी शंभरी पार केल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांनीही गेल्या तीन दिवसांत नव्वदी पार केली आहे. २५ ते २८ जुलैदरम्यान गॅस्ट्रोचे तब्बल २२० रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे गॅस्ट्रोची लागण होते. मलेरियाचे ११४ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांचेही प्रमाण गेल्या चार दिवसांत वाढले आहे. डेंग्यूच्या ९१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. ४४ लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापाच्या रुग्णातही वाढ झाली आहे. १ हजार २० तापाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर हेपिटायटिसचे १८ रुग्ण आढळले आहेत. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस आणि मध्येच ऊन असे काहीसे वातावरण आहे. अशा वातावरणात साथींचे आजार बळावण्याचा धोका असतो. दमट वातावरण हे विषाणूंच्या वाढीस पोषक असते. त्याचबरोबर साठलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढते. त्यामुळे आजारांचा धोका असल्याने मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी) >डेंग्यू रोखण्यासाठी ही काळजी घ्या...डास चावू नयेत म्हणून हात-पाय झाकले जातील असे कपडे घाला रात्री झोपताना डासांपासून बचावासाठी जाळ्या लावारुग्णांना डास चावणार नाहीत याची काळजी घ्याघरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा तरी रिकामी करा पाण्याची भांडी, पिंप पूर्ण बंद राहतील याची काळजी घ्या, घट्ट झाकण लावाआजूबाजूच्या परिसरात टायर, करवंट्या, अडगळीचे सामान राहणार नाही याची काळजी घ्या.>लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी ही काळजी घ्या...साचलेल्या दूषित पाण्यातून चालणे टाळाजोखीम गटातील व्यक्तींनी शारीरिक स्वच्छता राखाकचरा उचलावा, गटारांमध्ये कचरा अडकून गटारे तुंबणार नाहीत याची काळजी घ्यावीरहिवासी क्षेत्रात पाणी अधिक काळ साठून राहणार नाही याची काळजी घ्याअन्नपदार्थ स्वच्छ जागी आणि झाकून ठेवावेतसाचलेल्या पाण्यातून चालताना शक्य असल्यास गमबूट वापरावेत.