शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप मालकांवरही लवकरच गंडांतर

By admin | Updated: July 2, 2017 04:14 IST

राज्यातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा मोर्चा लवकरच पंपमालकांकडे वळणार आहे. पेट्रोलपंपांवर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा मोर्चा लवकरच पंपमालकांकडे वळणार आहे. पेट्रोलपंपांवर हेराफेरी करण्यासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स चिप्स प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविल्या असून, त्याविषयी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पंपमालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाहनांमध्ये इंधन भरणाऱ्या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करून, ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी गत दोन आठवड्यांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत ६२ पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४० पंपांना सील ठोकण्यात आले. डोंबिवली आणि ठाण्यातील दोन पंप पूर्णत: सील करण्यात आले. उर्वरित पंपांवरील ज्या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये गडबड आढळली, केवळ तेच युनिट सील करण्यात आले. सर्व प्रकरणांमध्ये १८ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १० तंत्रज्ञ, काही व्यवस्थापक आणि कर्मचारी, तर दोन पंपमालकांचा समावेश आहे.पोलिसांनी पेट्रोलपंपांवरून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि हेराफेरीसाठी वापरलेले इतर साहित्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोलिसांच्या कारवाईचा मोर्चा पंपमालकांकडेही वळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.चार पेट्रोलपंपांची तपासणीशुक्रवारी पोलिसांनी इंडियन आॅइलच्या चार पेट्रोलपंपांची तपासणी केली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील जयदास तारे यांचा समर्थ कृपा आॅटोमोबाइल्स, ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील कांता सिंग यांचा सागर आॅटोमोबाइल्स, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दहिगाव रणगिरी येथील रामनाथ फकीरचंद अँड सन्स आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर येथील शरद चव्हाण यांच्या द्वारकाधीश पेट्रोलपंपाचा समावेश आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील पेट्रोलपंप वगळता, उर्वरित तिन्ही पंपांवर हेराफेरी आढळली. सद्यस्थितीत ठाणे पोलिसांची पथके नागपूर, धुळे, चंद्रपूर आणि यवतमाळ भागांत कार्यरत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेट्रोलपंपांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.