शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत गॅस सिलिंडरच्या स्फोटात २१ बळी!

By admin | Updated: August 11, 2015 22:29 IST

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अहवाल; १२८ जखमींना आले कायमचे अपंगत्व.

अनिल गवई/ खामगाव (बुलडाणा) : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून होणार्‍या गॅस गळतीसोबतच निष्काळजीपणामुळे झालेल्या स्फोटांच्या ६३ घटनांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल २१ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. तसेच या घटनांमध्ये १२८ जण गंभीर जखमी होऊन, त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अहवालानुसार राज्यात गेल्या तीन वर्षांत गॅस गळती आणि स्फोटांच्या घटना वाढल्याचे चित्र दिसत आहे. सन २0१२-१३ या आर्थिक वर्षांमध्ये अशा प्रकारच्या केवळ सहा घटना घडल्या होत्या. २0१३-१४ मध्ये १२ आणि २0१४-१५ या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत १५ घटना घडल्या आहेत.

*गॅस वितरक कंपन्यांची चालढकल

        घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडर्सची सक्तीने तपासणी करण्याचे निर्देश शासनाने गॅस वितरक कंपन्यांना दिले आहेत; मात्र या कंपन्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. ग्राहक जागृती मेळाव्यांनाही केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे.

वर्ष          घटना           मृत्यू         जखमी

२0१२-१३       0६             00              १३

२0१३-१४      १२             १२                ४५

२0१४-१५      १५              0९               ७0