शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याने दमले प्रशासन

By admin | Updated: May 6, 2017 02:50 IST

तब्बल १ हजार टन कचऱ्यावर शहरातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रोज प्रक्रिया होत आहे, तरीही ६०० टन कचरा शिल्लक राहतो

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तब्बल १ हजार टन कचऱ्यावर शहरातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रोज प्रक्रिया होत आहे, तरीही ६०० टन कचरा शिल्लक राहतो. शिल्लक कचरा दिशा व अजिंक्य या अनुक्रमे रामटेकडी व हडपसर येथील प्रकल्पांमध्ये साठवून ठेवला जात होता; मात्र या दोन्ही प्रकल्पांची क्षमता आता संपुष्टात येत चालली आहे. येत्या चार दिवसांत डेपोची समस्या सुटली नाही, तर शहर कचराकुंडी होण्याची दाट शक्यता आहे.शिल्लक कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करताना प्रशासन आता दमले असून, महापौर व पालकमंत्री परदेशातच असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या उर्वरित पदाधिकारीही हतबल झाले आहेत. सलग २० दिवसांनंतरही कचरा डेपोची समस्या अद्याप आहे तिथेच आहे. उरुळी येथील ग्रामस्थांनी कचरा टाकू न देण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचे प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. सध्या शहरात एकूण ४८ प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कचरा जिरवला जात आहे. वडगाव येथील प्रकल्प ५० टनांचा असूनही तिथे १०० टन कचरा रोज जिरवला जातो. काही प्रभागांमधील ५ ते ७ टन क्षमतेच्या प्रकल्पांमध्ये दीड पट जास्त कचरा दिला जातो. हे प्रकल्प महापालिकेने चालविण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या संस्थांना दिले आहेत. त्यांना कर्मचारी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रकल्प सतत सुरूच ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. या मार्गाने सध्या शहरातील सुमारे १ हजार टन कचरा जिरवला जात आहे. त्यामुळेच सलग २० दिवस होऊनही शहरातील कचरा समस्येने अद्याप उग्र स्वरूप धारण केलेले नाही.मात्र, आता रोजचा शिल्लक ६०० टन कचरा ज्या दिशा व अजिंक्य या प्रकल्पांमध्ये साठवून ठेवला जात होता, त्या प्रकल्पांची क्षमता आता संपली आहे. रोज तिथे महापालिकेची कचरा जमा केलेली वाहने येऊन कचरा डंप करतात. तिथेच ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात येऊन दोन्ही प्रकारचा कचरा साठविण्यात येत आहे. सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये रोजच्या रोज कचरा जात असल्यामुळे दोन्ही प्रकल्पांमधील कचरा रोज भर पडत असल्याने वाढतच चालला आहे. यावर उपाय म्हणून कचरा जमा करणाऱ्या वाहनचालकांना कचरा शहरातील उड्डाणपुलांच्या खाली असणाऱ्या पोकळीत साठवण्यास सांगण्यात आले होते. धायरी येथील उड्डाणपुलाच्या खाली असा कचरा साठवण्यात येत होता; मात्र स्थानिक नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्यावर शुक्रवारी दुपारी तो तिथून हलवण्यात आला. सर्व प्रयत्न करून, वेगवेगळी आश्वासने दिल्यानंतरही उरुळी ग्रामस्थ ऐकायला तयार नसल्याने आता प्रशासनालाही चिंता भेडसावू लागली आहे.महापालिकेत सत्ताधाऱ्यांपैकी उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हेही आता ग्रामस्थांबरोबर चर्चा करून त्रस्त झाले आहेत. भिमाले म्हणाले, की प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.शहरातील प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात येत आहे, येत्या १० दिवसांत वडगावमध्ये दोन प्रकल्प नव्याने सुरू करत आहोत. प्रशासनाला शहरात कचरा साठू देऊ नये, असे सांगण्यात आले़विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही प्रश्न सुटावा, अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सत्ताधाऱ्यांमधील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नाहीत, सरकार म्हणजे मुख्यमंत्री यात लक्ष घालायला तयार नाहीत; त्यामुळे विनाकारण प्रश्न चिघळत चालला आहे, अशी टिका त्यांनी केली. काँग्रेस, मनसे, शिवसेना हेही आता या विषयावर आंदोलन करून, सत्ताधारी भाजपावर टीका करून शांत झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे, असे मत विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.