शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे उन्हाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज

By admin | Updated: April 23, 2015 00:08 IST

विविध उपक्रम : अजूनही आरक्षणास थंड प्रतिसाद

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे उन्हाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहे. यावर्षीही पर्यटकांच्या स्वागतासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गणपतीपुळेसह निवेंडी, मालगुंड, वरवडे, रीळ, उंडी, केसपुरी, भंडारपुळे, नेवरे, कोतवडे या ठिकाणची रिसॉर्ट्स, हॉटेल्स, लॉजिंग आदी सर्व रंगरंगोटी, डागडुजी करुन सेवा सुविधा देण्यास सज्ज झाली आहेत. पर्यटन हंगाम असल्याने वातानुकुलीत यंत्रणा सज्ज आहे. भारनियमनाच्या काळात गैरसोय होऊ नये, याकरिता जनरेटर, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध करुन पर्यटकांचे समाधान करण्यास येथील सर्वच व्यावसायिक आतुरले आहेत.गणपतीपुळेसह आरे-वारे व मालगुंड बीचवर विविध खेळांचे उपक्रम राबवले जात आहेत. आरे-वारे बीचवर मोटरबोट, स्कूटर व पँडल बोटिंग आदी जलक्रीडा पर्यटकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याला पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. गणपतीपुळे बीचवर जलक्रीडा, उंट व घोडा सफारी, रेल्वेगाडी, बंपिंग उडी, बीचवर राऊंड मारण्यासाठी बाईक राईड, खेळण्यासाठी विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये बॅटबॉल, हॉलीबॉल, टेनिस बॉल, रिंग आदी विविध खेळांचे साहित्य पर्यटकांना बीचवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.नारळपाणी, भेळपुरी, बर्फगोळा, सरबत आदी सुविधाही बीचवर उपलब्ध असून, पर्यटकांना येथील आठवणी घेऊन जाण्यासाठी बीच फोटो काढण्यासाठी मुले तयार असतात. एका मिनिटात फोटो मिळत असल्याने पर्यटकही आनंदाने येथील आठवणी घेऊन जातात. तसेच मालगुंड बीचवर बोटिंगचे विविध प्रकार तसेच पॅरासिलिंग व पॅराग्लायडिंगची सुविधा मालगुंड येथील भूषण मेहेंदळे, विद्याधर पुसाळकर व सनी मयेकर या युवकांनी पर्यटकांसाठी सुरु केल्या आहेत.गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदर दर्शनासाठी भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गर्दी टाळण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येते. सर्व भाविकांना १२ ते २ खिचडी प्रसाद व सायंकाळी ७ ते ८ पुलाव प्रसाद देण्यात येतो. तसेच भक्तनिवास लवकरच भक्तांच्या सेवेत रुजू होणार आहे. पर्यटन हंगाम लक्षात घेता ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्यामार्फत एकदिशा मार्ग तसेच पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. स्मशानभूमी परिसरातील मैदान आणि भंडारपुळे मार्गावरील मैदानात ही सोय करण्यात आली आहे.पर्यटन हंगाम १ मे पासून सुरु होईल, असा अंदाज पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात राहण्याची व्यवस्था असल्याने म्हणावे तसे आरक्षण झाले नसल्याने पर्यटक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)