शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

गँगस्टर रवी पुजारीचे कंबरडे पुन्हा मोडले

By admin | Updated: November 19, 2014 05:04 IST

दिग्दर्शक महेश भट यांची हत्या घडवून बॉलीवूडसह मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, बिल्डरांमध्ये दहशत निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचे मुंबई गुन्हे शाखेने कंबरडे मोडले आहे

जयेश शिरसाट, मुंबईदिग्दर्शक महेश भट यांची हत्या घडवून बॉलीवूडसह मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, बिल्डरांमध्ये दहशत निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचे मुंबई गुन्हे शाखेने कंबरडे मोडले आहे. भट यांच्या हत्येची तयारी करणाऱ्या १३ जणांना गुन्हे शाखेने गजाआड केले. प्रत्यक्षात हे सर्वच स्वतंत्र मोडयूलप्रमाणे पुजारीसाठी काम करत होते. एकाच कारवाईत गुन्हे शाखेने चार मॉड्यूल पकडल्याने पुजारी बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे.मुंबई, युपी, बिहारमधून बेरोजगार तरुणांना हाताशी धरून व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थानाबाहेर हवेत गोळीबार घडवून आणायचे. शूटरकरवी तेथे स्वत:चा फोननंबर लिहिलेली चिठ्ठी सोडायची. फोन आलाच तर यावेळी हवेत गोळया झाडल्यात, पुढल्यावेळी तुझ्यावर किंवा कुटुंबियांवर झाडेन, अशी धमकी देऊन खंडणी उकळायची, ही पुजारीची मोडस आॅपरेंडी. तीनेक वर्षांपूर्वी शहरात ठिकठिकाणी अशाच पद्धतीने गोळीबार करवून पुजारीने दहशत निर्माण केली होती. त्याच्या बंदोबस्ताठी पश्चिम प्रादेशिक विभागातील हुशार, चपळ आणि अनुभवी अधिकाऱ्यांचे विशेष पथक निर्माण करण्यात आले. या पथकाने तब्बल १३ ते १५ पुजारी टोळीचे गँगस्टर गजाआड करून सर्व गुन्ह्यांची उकल केली होती.त्यानंतर पुजारीने फंडा बदलला. कामात सहभागी झालेल्या किंवा अटक झालेल्या गँगस्टरशी तो संबंध तोडू लागला. परिस्थितीने खचलेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना तो हाताशी धरू लागला. मात्र यावेळी त्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी व्यावसायिकांच्या कार्यालयात जो कोणी दिसेल त्याच्यावर गोळया झाडण्यास सुरुवात केली. यात मात्र व्यावसायिकांचे कामगार, कर्मचाऱ्यांचे विनाकारण प्राण जाऊ लागले.यावर्षी आॅगस्टपासून पुजारी पुन्हा सक्रिय झाला. आॅगस्ट महिन्यात त्याने दिग्दर्शक करीम मोरानी यांच्या घरावर गोळीबार घडवून आणला. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीदाराची हत्या घडविण्यासाठी शूटर धाडले. ते गुन्हे शाखेने गजाआड करून जे डे हत्याकांडाची पुनरावृत्ती टाळली. तर मोरानी गोळीबाराला फार प्रसिद्धी न देता पुजारीचे मानसिकरित्या खच्चीकरण केले. यामुळे अस्वस्थ झालेल्या पुजारीने विश्वासू साथीदार इशरत बादशहा शेख उर्फ राजा आणि महोम्मद अझीझ अब्दुल रशीद मर्चंट यांच्या माध्यमातून सुमारे चार मॉड्यूल तयार केली. यापैकी एका मॉड्यूलने मोरानी यांच्या घरावर गोळीबार केला होता. त्या व अन्य तीन मॉड्यूलनी भट यांच्या हत्येची तयारी सुरू केली होती. या सर्वांच्या चौकशीतून पुजारीच्या मॉड्यूलची धक्कादायक माहिती समोर आली.