शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: August 29, 2015 02:20 IST

मुंबईतील गाजलेल्या शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराची पुनरावृत्ती गुरुवारी रात्री औरंगाबाद नजीकच्या चिकलठाणा शिवारात घडली. प्रियकरासोबत फिरण्यास गेलेल्या २२ वर्षीय

औरंगाबाद : मुंबईतील गाजलेल्या शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराची पुनरावृत्ती गुरुवारी रात्री औरंगाबाद नजीकच्या चिकलठाणा शिवारात घडली. प्रियकरासोबत फिरण्यास गेलेल्या २२ वर्षीय तरुणीला व तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करून नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले.या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले, की पीडित २२ वर्षीय तरुणी कामधंद्यानिमित्त हडको परिसरात राहते. एका तरुणासोबत तिची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे अधूनमधून ते सायंकाळनंतर फिरायला जात असत. २७ आॅगस्टला रात्री ८ वाजेनंतर ते मोटारसायकलवरून जालना रोडने केम्ब्रिज शाळेकडून सावंगीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर आले. निर्मनुष्य ठिकाणी दुचाकी उभी करून ते गप्पा मारत असतानाच मोटारसायकलवरून आलेले २० ते २५ वयोगटातील चौघे जण त्यांच्या जवळ येऊन थांबले. दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी प्रियकराला पकडून ठेवले, तर इतर दोघांनी त्या तरुणीला जवळच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर ते दोघे केम्ब्रिज चौकात आले आणि त्यांनी तेथे उभे असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन घटनास्थळाकडे तातडीने धाव घेतली. मात्र तोपर्यंत ते चौघेही नराधम फरार झाले होते. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्पर कारवाईया घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी पीडित आणि तिच्या प्रियकराकडून आरोपींचे वर्णन आणि वयाची माहिती घेतली. त्या आधारे शुक्रवारी दुपारपर्यंत चार संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.