शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गंगा सोसायटीत दीड वर्षाने आली ‘गंगा’

By admin | Updated: April 6, 2017 03:49 IST

पूर्वेतील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमधील गंगा सोसायटीत अखेर दीड वर्षानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.

डोंबिवली : पूर्वेतील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमधील गंगा सोसायटीत अखेर दीड वर्षानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे इमारतीतील ४० सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने बातम्यांच्या माध्यमातून तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने हे शक्य होत असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.केडीएमसीच्या स्थायी समिती सभेत तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली होती. त्या वेळी तेथील भीषण पाणीटंचाई पाहून त्यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. ८४ हजारांची पाणीपट्टी या सोसायटीने पाणी येत नसतानाही भरली आहे. तरीही, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. जेथे बेकायदा नळजोडण्या आहेत, तेथे त्यांना मुबलक पाणी मिळत होते. त्यामुळे म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना हा विरोधाभास का, असा सवाल केला. म्हात्रे यांच्या या ‘स्टाइल’चा अनुभव अधिकाऱ्यांना असल्याने तातडीने सूत्रे हलली. पाण्याच्या मुख्य जलवाहिनीशी गंगा सोसायटीची लाइन जोडण्याचे काम दोन दिवसांत तातडीने हाती घेण्यात आले. मंगळवार आणि बुधवारी सुमारे १४०० फुटांवरून पाइप टाकण्यात आले. या भागात शुक्रवारी शटडाउन असल्याने शनिवारपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर, रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीड वर्षानंतर नळाला पाणी येणार असल्याने रहिवाशांनी म्हात्रे, स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे, माजी नगरसेवक रवी म्हात्रे, महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महापालिकेचे उपअभियंते योगेंद्र राठोड, देवेंद्र एकांडे आणि प्लंबर विलास विधाते यांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने फोडली वाचा‘लोकमत’ने दीर्घकाळ भेडसावणाऱ्या समस्येला वाचा फोडली आहे. अवघ्या महिनाभरात या समस्येची निदान दखल महापालिकेने घेतली. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आमच्या सोसायटीतील पाणीटंचाईची तीव्रता समजली. पाणीसमस्या निकाली निघत असल्याने गंगा सोसायटीतील रहिवासी ज्ञानेश्वर गाईगोळे, दिलीप डुंबरे, रमेश बेळणेकर, आनंद लोहार, संजय पवार, विनय नायर, नंदू आवळेगावकर, तुषार मुकीरवार आदींनी ‘लोकमत’चे आभार मानले.