शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम

By admin | Updated: September 7, 2016 01:06 IST

एखादा घरगुती समारंभ, रिस्पेशन, लग्नसराई अथवा सण-उत्सव असोत... आनंदाचे क्षण शेअर करण्याचे हक्काचे व्यासपीठ कुठले तर, व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक आणि ्ट्विटर असा एक टे्रंड रूजला आहे.

पुणे : एखादा घरगुती समारंभ, रिस्पेशन, लग्नसराई अथवा सण-उत्सव असोत... आनंदाचे क्षण शेअर करण्याचे हक्काचे व्यासपीठ कुठले तर, व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक आणि ्ट्विटर असा एक टे्रंड रूजला आहे. टेक्नोसॅव्ही असलेल्या तरूणाईला सं़पर्कासह संवादासाठी ही सोशल माध्यम आता अधिकच जवळची वाटू लागली आहेत, म्हणूनच गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदरच तरूणाईच्या व्हॉटस अँपचे स्टेटस, डीपी बदलले असून, अगदी पहिल्या दिवशी गणेशोत्सवाचे आगमन कसे झाले, घरातील सजावट, गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात वाजत गाजत गणरायाचे केलेले स्वागत, याची छायाचित्रे सोशल मिडियावर अपलोड करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाचे मेसेज, आरत्या, संस्कृत श्लोक यामाध्यमातून गणेशाची आराधना केली जात आहे. गणेशोत्सवाची ही क्रेझ आॅनलाईनसह स्मार्ट फोनवरही पुढील आठवडाभर राहणार आहे.घराघरांमध्ये जशी गणरायाच्या स्वागताची तयारी केली जाते, तशीच गणेशोत्सवाच्या काळात व्हॉटसअपचे स्ट्टेस, डीपी कुठले ठेवायचे, सोशल मिडियावर कधी, कोणत्या दिवशी वेगवेगळी छायाचित्रे अपलोड करायची याचे जोरदार प्लँनिंग तरूण मंडळींकडून केले जाते, त्यानुसार अगदी ठरल्या प्रमाणे टेक्नॉसँव्ही तरूणाईने गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच फेसबुकवर विविध छायाचित्रे अपलोड केल्याचे दिसून आले. दोन दिवसामध्ये गौरींचेही घरात आगमन होणार असल्याने तरूणींनीही छानपैकी प्लँनिंग सुरू झाले आहे. घराबरोबरच सोशल मिडियावरही अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा फंडा तरूणाईने निवडला आहे. दिवसभरात व्हॉटस अँपचा इनबॉक्सही मेसेजेस आणि छायाचित्रांनी फुल्ल होऊ लागला आहे. मानाच्या गणपतीपासून ते प्रतिष्ठेचे समजल्या जाणा-या दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळ या गणपतींचे दर्शनही दूर असलेल्या आप्तेष्टांना फेसबुक, व्हॉटस अँपच्या माध्यमातून घडविले जात आहे.