शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरची धुरा गणेश नाईकांकडे

By admin | Updated: May 7, 2017 05:46 IST

मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची

राजू काळे/ लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची दोर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातून बाहेर पडलेल्यांना धडा शिकवण्यासह निष्ठावंतांना येत्या पालिका निवडणुकीत न्याय देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. योग्य व ठोस नेतृत्वाअभावी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीला गळती लागल्याने पक्षातील बरेच निष्ठावंत दुसऱ्या पक्षात विसावू लागले. यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादीमध्ये इतर पक्षांप्रमाणेच गटातटांचे राजकारण सुरू असल्याचे सर्वश्रुत असल्याने माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या गटातील व त्यांचे समर्थक मानले जाणारे बहुतांश नगरसेवक भाजपा-सेनेत स्थिरावले. याचप्रमाणे नाईक यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीसोबत फारकत घेत सेना-भाजपात जाणे पसंत केले. पक्षात केवळ काही निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते उरले असतानाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हेही पक्ष सोडून भाजपाच्या तंबूत गेले. यामुळे उरलीसुरली राष्ट्रवादी तळागाळाला जाऊ नये, यासाठी प्रदेशपातळीवरून माजी उपमहापौर जयंत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली. पाटील यांचा पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू असतानाच पक्षातील धुसफूस मात्र सुरूच राहिली. ही बाब थेट नाईकांच्या कानी धाडून त्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची गळ घालण्यात आली. अखेर, ते मान्य करीत नाईकांनी पक्षातील अनिष्टांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ते स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व गिल्बर्ट मेंडोन्सा सध्या कारागृहात आहे. मेंडोन्सा हे आमदारकीच्या निवडणुकीपासून शिवसेनेच्या संपर्कात होते व आजही ते सेनेतच जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१२ मधील निवडणुकीनंतर सुरुवातीला आघाडीच्या सत्तास्थापनेत मेंडोन्सा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, पुढील अडीच वर्षांची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. सत्ता मिळवण्यासाठी मेंडोन्सा यांची कन्या तथा माजी महापौर कॅटलिन परेरा या आपल्या वडिलांसोबत सतत सेनेच्या संपर्कात होत्या. यात कॅटलिन यांचा सेनेतील संपर्क दांडगा झाल्याने त्या सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याप्रमाणेच कुटुंबातील इतर काही नगरसेवक सेनेतच जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार?मागील निवडणुकीत आघाडी न केल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने परस्परांतील मतभेद बाजूला सारून येत्या पालिका निवडणुकीत आघाडी करणे आवश्यक आहे. आघाडीखेरीज पर्याय नसल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. यावरून, येत्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी होण्याचे संकेत मिळत असले, तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसकडून अद्याप संकेत मिळालेले नाहीत. निवडणूक जाहीर होताच जागावाटपावर चर्चा होईल. अधिक जागा काँग्रेसला देण्याची तयारी आतापासूनच केल्याचे सांगण्यात येत आहे