शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पेपरवर्कपेक्षा प्रत्यक्ष मॅटवरील खेळ महत्त्वाचा

By admin | Updated: May 18, 2016 05:54 IST

प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात संरक्षकांसह उत्कृष्ट आक्रमक खेळाडूंचीही निवड करताना संघ समतोल करण्यावर भर दिला

रोहित नाईक,

मुंबई-भक्कम बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगाल वॉरियर्स संघाने प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात संरक्षकांसह उत्कृष्ट आक्रमक खेळाडूंचीही निवड करताना संघ समतोल करण्यावर भर दिला. तरी, ‘‘पेपरवर्कच्या तुलनेत प्रत्यक्षात मॅटवरील कामगिरी अधिक महत्त्वाची आहे,’’ असे मत बंगाल वॉरियर्सचा कर्णधार नीलेश शिंदे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. तसेच, कबड्डीपटूही आता हायक्लास झाल्याचे नीलेशने नमूद केले.मुंबईतील नावाजलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावाच्या दिमाखदार कार्यक्रमानंतर नीलेश म्हणाला, ‘‘नव्या मोसमासाठी झालेला लिलाव बंगाल वॉरियर्ससाठी खूप चांगला ठरला. ज्या रेडर्सची कमतरता होती त्यांची यंदा संघात एन्ट्री झाली आहे. नितीन मदने, सुरजीत सिंग यांच्यामुळे संघाला मजबुती आली आहे; शिवाय आम्ही आमच्या ज्युनिअर खेळाडूंनाही संघात कायम राखण्यात यश मिळवले.’’ संघनिवडीबाबत नीलेशने सांगितले, ‘‘सध्या बंगाल वॉरियर्स कागदावर तरी पूर्णपणे समतोल आहे. आता मॅटवर सर्वोत्तम कामगिरी करणे हे महत्त्वाचे आहे. शेवटी प्रत्यक्ष सामन्यात उत्कृष्ट खेळाला किंमत आहे. पेपरवर्कला काहीही महत्त्व नसते. जेव्हा सर्वोत्तम खेळ होतो तेव्हाच यश मिळते.’’बंगाल वॉरियर्स संघात मोठ्या प्रमाणात मराठी खेळाडूंचा समावेश आहे. याविषयी नीलेशने सांगितले, ‘‘संघात मराठी खेळाडूंचा समावेश करणे आमचे लक्ष्य नव्हते. आम्ही प्रत्येक खेळाडूवर एक विशिष्ट बजेट ठरवून त्यानुसार बोली लावली. व्यावसायिक कबड्डी स्पर्धांमध्ये मी, विशाल माने, गिरीश एर्नाक, सुरजीत सिंग आम्ही एकाच बीपीसीएल संघातून खेळतो. त्यामुळे आमच्यातील ताळमेळाचा फायदा बंगालला होईल. त्याचप्रमाणे अनुभवी विशाल माने संघात आल्याने तो बाजीराव होडगेची जागा भरून काढेल. यू मुंबासाठी विशालने अनेकदा चमकदार खेळी केली आहे. बंगालकडूनही तो चांगला खेळ करेल यात शंका नाही,’’ असेही नीलेश म्हणाला.>बोली बजेटबाहेरबंगाल वॉरियर्सने लिलावामध्ये उजव्या कोपरासाठी डी. सुरेशसाठी आणि डावा कोपरासाठी जीवा कुमारसाठी खूप प्रयत्न केले, परंतु दोघांची बोली बजेटबाहेर गेल्याने प्रयत्न सोडून दिल्याची माहिती नीलेशने या वेळी दिली. तसेच प्रत्येक संघाने चांगल्या खेळाडूंची निवड केली. परंतु,‘अ’ श्रेणीच्या खेळाडूंचा विचार केल्यास बंगालसह, तेलगू टायटन्स, यू मुंबा, पुणेरी पलटन व पटना पायरेट्स यांनी उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली असल्याचेही नीलेश म्हणाला.कबड्डीला खूप चांगले दिवस आले आहेत. देशात यापूर्वी मिडल किंवा लो क्लासमध्ये असलेले कबड्डीपटू आज हायक्लासमध्ये आले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये कबड्डीपटूंचा लिलाव होत आहे ही कबड्डीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. याआधी खेळाडू गेट वे आॅफ इंडियाला येऊन केवळ फोटो काढायचे. मात्र यानिमित्ताने याच गेट वेच्या समोरील पंचतारांकित हॉटेलमध्ये लिलावात सहभागी होत आहेत, याचा अभिमान आहे.- नीलेश शिंदे