शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारण्याचा होता डाव

By admin | Updated: May 17, 2016 05:29 IST

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सुशांत साळुंखे उर्फ काला खट्टा याने शिवडीत गोळीबार केला.

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सुशांत साळुंखे उर्फ काला खट्टा याने शिवडीत गोळीबार केला. या गोळीबारानंतर तो पत्नीलादेखील ठार मारण्याच्या प्रयत्नात होता, मात्र पत्नीने वेळीच दोन वर्षांच्या चिमुरडीसह पळ काढल्याने ती यातून बचावली. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी काला खट्टाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. शिवडी परिसरात राहत असलेल्या गणेश पोळ याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय साळुंखेला होता. याच संशयातून त्याने पोळवर गोळी झाडून त्याला जखमी केले. त्याने पत्नीच्याही हत्येचा कट आखला. मात्र अनेकदा संधी हुकल्याची माहिती तपासात समोर आली. साळुंखेच्या संशयी वृत्तीला कंटाळून गेल्या दीड महिन्यापासून त्याची पत्नी डोंबिवली येथे वडिलांकडे राहण्यास गेली होती. पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने रविवारी रात्री साळुंखेने डोंबिवली येथून पत्नीला आणि मुलीला रिक्षातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. वाटेत मुलगी रडू लागली. याचाच फायदा घेत त्याच्या पत्नीने रिक्षा मध्येच थांबवली. मुलीला पाणी पाजून आणते, असे सांगून तेथून पळ काढला. याची माहिती तिने पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत साळुंखे तेथून पसार झाला. या प्रकरणी पत्नीचा जबाब नोंदवून आर. ए. के. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)