शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘एमटीडीसी’चा खेळखंडोबा

By admin | Updated: January 30, 2015 00:16 IST

पर्यटन विकासाला खीळ : भाडे आणि दुरुस्तीमध्ये अडकले पर्यटन महामंडळ

संदीप खवळे - कोल्हापूर पर्यटनाच्या माध्यमातून महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळविण्याची संधी असतानाही पर्यटन विकास महामंडळाने कोल्हापूरकडे केलेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. केवळ एक सहायक कर्मचारी आणि शाखा अभियंता यांच्यावर कोल्हापूर येथील कार्यालयाचा भार आहे.  बुकिंग सोडले तर पर्यटन व्यवसायाला चालना देणारे कोणतेही काम या कार्यालयामधून होत नाही. पन्हाळा फोर्ट या पर्यटन निवासाला भाडेच न दिल्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने निवास सील केल्याचे समजते; तर दाजीपूर आणि गगनबावडा येथील पर्यटन निवास केंद्रे अद्यापही दुरुस्त व्हायची आहेत.  १९७५ ला महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयाकडे पन्हाळा येथे पन्हाळा फोर्ट आणि महालक्ष्मी पर्यटन निवास अशा दोन मालमत्ता भाग भांडवलापोटी देण्यात आलेल्या होत्या. यांपैकी पन्हाळा फोर्ट आणि महालक्ष्मी पर्यटन निवास भाडेकराराने देण्यात आले होते. यातील पन्हाळा फोर्टचे भाडे न दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी या पर्यटन निवासाला महामंडळाने कुलूप लावल्याचे समजते. महालक्ष्मी रिसॉर्टही भाडेकराराने दिलेले आहे. दाजीपूर आणि गगनबावडा येथील पर्यटन निवास केंद्रांची दुरुस्तीच सुरू आहे. आजघडीला एम.टी.डी.सी.च्या कोल्हापूर कार्यालयाकडून एकही पर्यटन केंद्र चालविले जात नाही. परिणामी, उत्पन्नावर प्रचंड परिणाम होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कोल्हापूर येथील विभागीय कार्यालय बंद करून ते प्रथम रत्नागिरी व त्यानंतर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पुणे कार्यालयास जोडले. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनाला खीळ बसली आहे. पन्हाळा फोर्टच्या नूतनीकरणासाठी सन २००९-१० मध्ये  १ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले आहेत; पण पन्हाळा फोर्टच्या मालमत्तेवर ‘सरकारी मालकीची जमीन’ असा शेरा असल्यामुळे पन्हाळा नगरपरिषदेने बांधकाम परवाना नाकारला आहे. त्यामुळे नूतनीकरणास ‘खो’ बसून गेली पाच वर्षे हा निधी तसाच पडून आहे. कोल्हापूर येथे महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय पूर्वीप्रमाणे सुरू झाले पाहिजे. कार्यालय असल्याशिवाय इथल्या पर्यटन विकासाला चालना मिळणार नाही. पर्यटन विकासाशी संबंधित बाबींचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले नाहीत. केंद्राकडे पर्यटन विकासासाठी भरीव निधी आहे.- आनंद माने, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज