शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाडांवरील विमानबंदी पूर्णत: उठली

By admin | Updated: April 9, 2017 04:52 IST

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर, वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी एअर इंडियापाठोपाठ इतर

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर, वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी एअर इंडियापाठोपाठ इतर सर्व एअरलाइन्सने शनिवारी उठविली. मात्र, तरीही खा. गायकवाड यांनी दिल्ली ते मुंबई हा प्रवास रेल्वेनेच केला. आपल्यावरील विमानबंदी उठविण्यात यावी, असे पत्र खा. गायकवाड यांनी शुक्रवारी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना लिहिले होते आणि त्यात त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेदही व्यक्त केला होता. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरील बंदी एअर इंडियाने शुक्रवारी तत्काळ हटवली होती. जेट एअरवेज, गो-एअर, स्पाइसजेट आणि इंडिगो या सर्व विमान कंपन्यांनी ही बंदी शनिवारी मागे घेतली. तरीही गायकवाड शुक्रवारी रेल्वेनेच दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर खा. गायकवाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी खा. गायकवाड यांना समज दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)बिझनेस क्लास नसल्याने झाला होता वादरवींद्र गायकवाड संसद अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना, त्यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला. बिझनेस क्लासचे तिकीट असताना आपणास विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले, अशी त्यांची तक्रार होती, पण ते ज्या एअर इंडियाच्या विमानाने गेले, त्यात बिझनेस क्लास नव्हता आणि त्याची कल्पना एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने गायकवाड यांच्या कार्यालयाला दिली होती.