शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

गडकरी यांची शिष्टाई असफल

By admin | Updated: March 2, 2015 02:48 IST

भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा याकरिता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेली शिष्टाई सपशेल असफल ठरली आहे. परिणामी, भूसंपादन विधेयकातील काही तरतुदींना असलेला शिवसेनेचा

मुंबई : भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा याकरिता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेली शिष्टाई सपशेल असफल ठरली आहे. परिणामी, भूसंपादन विधेयकातील काही तरतुदींना असलेला शिवसेनेचा विरोध कायम आहे. या तरतुदींसह हे विधेयक मंजूर होता कामा नये, असे लेखी निवेदन सेना केंद्र सरकारला देणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले आहे. भूसंपादन विधेयकातील बळजबरीने जमीन संपादित करणे, लोकांच्या सहमतीची गरज नसणे आणि सिंचनाखालील सुपीक जमीन संपादित करण्यास परवानगी असणे यांसारख्या तरतुदींना शिवसेनेने विरोध केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ठाकरे-गडकरी भेटीतून काही निष्पन्न झालेले नाही, असे स्पष्ट केले. भूसंपादन विधेयक मांडण्यापूर्वी भाजपाने शिवसेनेबरोबर चर्चा का केली नाही, असा सवाल करून देसाई म्हणाले की, तसे केले असते तर या विधेयकाला शिवसेनेचा असलेला आक्षेप अगोदर कळला असता. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देऊ शकत नाही. शिवसेना आपल्या आक्षेपांबाबत लेखी निवेदन केंद्र सरकारला देणार असून, विधेयकातील कुठले जाचक मुद्दे मंजूर होता कामा नयेत ते सरकारच्या लक्षात आणून देणार आहे.