शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: October 26, 2014 00:20 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भागवत

संघ मुख्यालयात चर्चा : सदिच्छा भेट की राजकीय चर्चा? नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भागवत यांच्याशी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसह एकूणच राजकारणावर चर्चा केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी गडकरी मंत्रीपदाचा लवाजमा बाजुला ठेवून दुचाकीवरून वाड्यावरून संघ मुख्यालयाकडे निघाले. गडकरी दुचाकीवर निघाल्याचे कळताच माध्यम प्रतिनिधींनी संघ मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकच गर्दी केली. प्रवेश द्वारावर कुणाशीही न बोलता गडकरी सरळ आत गेले. गडकरी सुमारे अर्धा तास संघ मुख्यालयात होते. गडकरी आणि भाजपचे इतर ज्येष्ठ नेते दरवर्षी विजयादशमीला आणि दिवाळीला सरसंघचालकांची सदिच्छा भेट घेत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती. परंतु, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण बघता दिवसभर या भेटीबद्दल माध्यमांमध्ये चर्वितचर्वण सुरू होते. प्रत्येकजण आपापले तर्कवितर्क लढवत होते. भागवत व गडकरी यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. परंतु महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. भागवत शुक्रवारी रात्री दिल्लीहून नागपुरात परतले. त्यानंतर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. (प्रतिनिधी)उमा भारती - गडकरी भेटकेंद्रीय मंत्री उमा भारती शनिवारी सायंकाळी नागपुरात आल्या. रात्री ९ वाजता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मी आपल्या भेटीसाठी येत आहे असा फोन उमा भारती यांनी गडकरी यांना रात्री ८.३० वाजता केला. तेव्हा गडकरी यांनी त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. या भेटीच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते.