शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

विकास प्रकल्पांना गडकरींचे बुस्टर

By admin | Updated: June 15, 2014 00:57 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शहर विकासाचे आश्वासन दिले होते. आता ती आश्वासने पूर्ण करम्यासाठी ते कामाला लागले आहेत. महापालिका व नासुप्रच्या

प्रकल्प तातडीने मार्गी लावा : नासुप्र, महापालिकेच्या २४ प्रकल्पांचा आढावानागपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शहर विकासाचे आश्वासन दिले होते. आता ती आश्वासने पूर्ण करम्यासाठी ते कामाला लागले आहेत. महापालिका व नासुप्रच्या माध्यमातून शहर विकासाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेले व प्रस्तावित प्रकल्प तातडीने मार्गी लागावे, यासाठी त्यांनी शनिवारी रविभवन येथे विकास कामांचा आढावा घेतला. अडचणी दूर करून प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील वाहतुकीसाठी मनपाने हाती घेतलेल्या सिमेंट रस्त्यांची स्थिती व कामाचा प्रगती अहवाल व प्रस्तावित व्दितीय टप्प्याचा अहवाल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सिमेंट रस्त्याबाबत अंतिम अहवाल आल्यानंतर यावर ताडतीने बैठक घेण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. वर्धा रोड ते हिंगणा रोडपर्यंतच्या डिफेन्सच्या जागेवर आॅरेंज सिटी स्ट्रीट , वाणिज्यिक रहिवासी, सामाजिक सुधारणा सेंटर आदी प्रकल्प लंडन स्ट्रीटच्या धर्तीवर मनपाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. लंडन स्ट्रीट प्रकल्पालगत डिफेन्सची जागा आहे. या जागेवर हा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती मनपातील सत्तापक्षनेते प्रवीण दटके यांनी दिली. शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने शहरातील बगिच्यांच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. शहरात मनपा व नासुप्रचे किती बगिचे आहेत. नासुप्रकडून मनपाला किती बगिचे हस्तांतरित करण्यात आले. त्यांची सध्याची स्थिती, सुरू असलेल्या व प्रस्तावित कामाचा आढावा घेण्यात आला. बगिचा सौदर्यीकरणाला गती देण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. शहरातील मार्गावर एलईडी लाईट लावण्याचे प्रस्तावित आहे. ४० कि.मी. लांबीच्या मार्गावर २७ हजार एलईडी लाईट लावण्यात येणार आहे. तसेच शहरातील मार्गावर असलेल्या विद्युत खांबामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रशासनाची भूमिका व प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अंबाझरी उद्यानाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याचा प्रस्ताव आहे. याला शासनाकडून कायदेशीर मंजुरी मिळावयाची असल्याने टेंडर प्रक्रि या झालेली नाही. या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. काठावर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील लाईट, साऊंड व लेझर शोचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र सरकारच्या कला संचालनालयाची मंजुरी घेतल्यानंतर येथे विवेकानंदांची मूर्ती उभारली जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली. बैठकीला आ.कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, नागो गाणार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, गिरीश देश्मुख, रमेश शिंगारे, बंडू राऊ त, किशोर डोरले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, अविनाश ठाकरे, अपर आयुक्त हेमंत पवार, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, उपायुक्त संजय काकडे, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, मेट्रोचे अधीक्षक अभियंता पी.एम.किडे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. बाजारांचा विकासलोकांच्या सुविधासाठी मच्छीमार्केट, भाजी बाजार व आठवडी बाजारांचा विकास करण्याची गरज आहे. याचा आढावा घेण्यात आला. यात मोमीनपुरा कत्तलखाना बकरा मंडी, सक्करदरा येथील बुधवार बाजारात बाजार व शॉपिंग मॉलची निर्मिती, सदर येथील मंगळवारी बाजार, सतरंजीपुरा येथील लोहाबाजार, महाल भागातील बुधवारी बाजार, बाबुुळखेडा येथील भाजीपाला व शॉपिंग संकुल, महात्मा फुले मार्केट येथील जुनी इमारत तोडून अत्याधुनिक भाजी मार्के ट, मच्छी मार्केट व इतर मार्केटची उभारणी तसेच मस्कासाथ येथील मच्छी मार्केटचा विकास केला जाणार आहे. या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.तलावांचे सौंदर्यीकरणनागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेले तलाव आहेत. या तलावांचे सौंदर्यीकरण व पर्यटनाच्या दृष्टीने सशक्तीकरण व पुनरुज्जीवन क रण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे शहराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यात अंबाझरी तलाव, गांधीसागर तलाव, सोनेगाव तलाव, नाईक तलाव, लेंडी तलाव व पांढराबोडी तलावांचा समावेश आहे. जेएनएनयुआरएम अंतर्गत शहरात राबविल्या जात असलेल्या प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पाच्या मास्टर प्लॉन संदर्भात आढावा घेण्यात आला. भांडेवाडी येथे मलनिस्सारण प्रकल्पाच्या निविदा झाल्यानंतर कामातील प्रगती, नागनदीवरील प्रस्तावित मलनिस्सारण प्रकल्प, पिवळी व नागनद्यांच्या स्वच्छतेचा आढावा घेतला. सुधाकर कोहळे यांनी कन्हान नदीच्या बॅरेज कामाची माहिती दिली. (प्रतिनिधी)अनधिकृत ले -आऊ टचा प्रश्न निकाली काढणारअनधिकृत ले आऊ टचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश गडकरींनी दिले. नासुप्रने मनपला हस्तांतरित केलेले अभिन्यास व विकास कामांचा आढावा घेतला. ६७२ व १९००ले- आऊ टमधील प्रलंबित कामे पूर्ण करा, मनपाप्रमाणे नागरिकांना पाणी, रस्ते व सिव्हर लाईनची सुविधा देण्याचे निर्र्र्देश दिले. मेट्रोसंदर्भात मुख्यमंत्री बैठक घेणारशहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पाला काही विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावयाचे आहे. ते २-३ दिवसात मिळतील. मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तातडीने बैठक घेणार असल्याची माहिती नासुप्र अधिकाऱ्यांनी दिली.