शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक

By admin | Updated: February 14, 2015 03:52 IST

त्तर गडचिरोलीत डीव्हीसी सदस्य म्हणून कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी शिवाजी उर्फ मैनू आयवा पोसुडी (२८) व प्लाटून सदस्य सविता

गडचिरोली : उत्तर गडचिरोलीत डीव्हीसी सदस्य म्हणून कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी शिवाजी उर्फ मैनू आयवा पोसुडी (२८) व प्लाटून सदस्य सविता उर्फ अस्मिता बाजू तुमरेटी (१९) हिला पोलिसांनी मंगळवारी एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील ताडबैली जंगल परिसरात अटक केली आहे. विशेष म्हणजे सात वर्षांनंतर प्रथमच डीव्हीसी सदस्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी हा अस्मितासोबत कुटुंबाला भेटण्यासाठी तोडगट्टा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला तोडगट्टापासून जवळच असलेल्या ताडबैली जंगल परिसरात अटक केली. यापूर्वी २००६ मध्ये याच डिव्हीजनचा सदस्य मडावी याला अटक केली होती. शिवाजीला अटक झाल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. शिवाजी हा अत्यंत जहाल नक्षलवादी म्हणून ओळखला जातो. शिवाजी पोसुडी हा प्लाटून क्रमांक ३ चा कमांडर व उत्तर गडचिरोली डिव्हिजन सदस्य म्हणून कार्यरत होता. नोव्हेंबर २००४ मध्ये तो गट्टा दलममध्ये भरती झाला. नोव्हेंबर २००८ पर्यंत त्याच ठिकाणी तो कार्यरत होता. त्यानंतर प्लाटून क्रमांक १४ मध्ये त्याची बदली झाली. फेब्रुवारी २०१० पर्यंत तो तेथेच कार्यरत होता. आॅगस्ट २०१० मध्ये प्लाटून क्रमांक ३ चा कमांडर म्हणून व डिसेंबर २०१३ मध्ये डीव्हीसी सदस्य म्हणून त्याला तेथेच पदोन्नती देण्यात आली. तेव्हापासून तो त्याच ठिकाणी कार्यरत होता. २०१३ मधील पेंदूलवाही, हिदूर, २०१२ मधील गडदापल्ली, कोटमी, येर्रागड्डा, २००५ मधील कुंजेमरका, २००८ मधील सिरकोंडा, कोरेपल्ली, येडमपायली, रसपल्ली, २०१० मधील दोबोगुडा, कोंदावाही येथील चकमकीमध्ये त्याचा समावेश होता. त्याचबरोबर परपनगुडा येथील पुसु झुरू हेडो, कारका येथील पित्रू हेडो, कचलेर येथील पोलीस पाटील यांच्या खूनामध्येही त्याचा सहभाग आहे. रसपल्ली, दोडगिरी येथील वन विभागाच्या ट्रॅक्टरची जाळपोळ, मानेवारा, कमलापूर, नांगेवाही, कोटमी, जवेली, हालेवारा या नक्षल्यांमध्येही त्याचा समावेश आहे. शिवाजीवर १६ लाखांचे बक्षीस होते़ सविता तुमरेटी ही सुद्धा जहाल नक्षलवादी असून, जानेवारी २०११ मध्ये कसनसूर एलओएस सदस्य म्हणून ती भरती झाली. जून २०१४ पर्यंत ती याच दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ४ लाख रूपयांचे बक्षीस होते. हिदूर, पेंदुलवाही, ताडगुडा, गर्दापल्ली येथील चकमक, जारावंडी ग्रामपंचायतीची जाळपोळ, मानेवारा येथील लालसू कुमोटी याच्या खून प्रकरणात तिचा समावेश असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)