शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: September 3, 2014 01:12 IST

सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वसतिगृहातील आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. सतत मागणी केल्यानंतरही

राजुरा : सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वसतिगृहातील आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. सतत मागणी केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मंजुर करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील २ हजार ३८८ वसतिगृह अधीक्षक, २ हजार ८५८ स्वयंपाकी, ४७० मदतनीस आणि २ हजार ३८८ चौकीदारांना तुटपुंज्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करणाऱ्या आघाडी सरकारने आपल्याच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजुर केला असतानाही अवघ्या ७८ कोटींचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडेल, या भीतीपोटी आठहजार कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय त्यांच्या समोर मांडला. २०१२ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले. त्यावर सामाजिक न्याय विभागाने काहीच केले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सी.एच. चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यात २ हजार ३८८ वसतिगृह असून अनेक वसतिगृहात कार्यरत कर्मचारी गरीब व मागासलेल्या समाजाचे आहेत. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही १५ वर्षांमध्ये हा प्रश्न सोडविण्यात तीन मुख्यमंत्र्याना यश आले नाही. स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ एप्रिल २०१३ ला वेतनश्रेणीचा प्रस्ताव दोन महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाला दिले होते. परंतु १६ महिन्यानंतरही वेतनश्रेणीचा तयार प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मंजुर करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील वसतिगृह कर्मचारी हतबल झाले असून अजून किती दिवस न्यायासाठी वाट पाहायची, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)