शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भावी नगरसेवक उतावीळ

By admin | Updated: July 4, 2016 01:59 IST

विधानसभा निवडणुकीवेळी काही नगरसेवकांनी लक्ष्य विधानसभा, तसेच भावी आमदार, अशी जाहिरातबाजी केली होती.

पिंपरी : विधानसभा निवडणुकीवेळी काही नगरसेवकांनी लक्ष्य विधानसभा, तसेच भावी आमदार, अशी जाहिरातबाजी केली होती. त्याचे अनुकरण आता भावी नगरसेवक अशा पद्धतीने होऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी असे करणाऱ्यांची संख्या मोजकीच होती. महापालिका निवडणूक जवळ येऊ लागताच भावी नगरसेवक म्हणून मिरविणारे शहरात गल्लोगल्ली दिसून येत आहेत. लक्ष्य २०१७ असा उल्लेख करून, महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत दाखवून, जवळ आपली छबी उमटविलेले जाहिरातफलक शहरात ठिकठिकाणी दिसून येतात. सण, उत्सवाचे औचित्य साधून नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने स्वत:ची जाहिरातबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांसाठी लावण्यात येणाऱ्या जाहिरातफलकांवर जणू काही नगरसेवक झाल्याच्या आविर्भावातील त्यांची छबी पाहावयास मिळते. काहींनी तर स्वत:च्या आणि मित्रमंडळींच्या वाहनांच्या काचेवर भावी नगरसेवक असाच उल्लेख केला आहे. महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे सूचक संकेत त्यातून मिळू लागले आहेत. कधी पतसंस्थेची अथवा गृहसंस्थेची निवडणूक न लढलेल्यांनाही नगरसेवक झाल्याची स्वप्नं पडू लागली आहेत. या वेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक होणार आहे. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. त्यामध्ये चार उमेदवार एकत्रित निवडणूक लढणार आहेत. सुमारे ५० हजारांच्या मतदार संख्येचा प्रभाग असेल. मिनी विधानसभा मतदार संघ अशा स्वरूपातील पूर्वीपेक्षा आकाराने वॉर्ड मोठा असल्याने निवडणूक लढणे पहिल्यापेक्षा अवघड झाले आहे. अशा स्थितीत विद्यमान नगरसेवक, तसेच एकापेक्षा अधिक टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले धास्तावले आहेत. बदललेली राजकीय परिस्थिती, वॉर्ड फेररचना, सोशल मीडियाचा निवडणुकीत होणारा वापर यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकते, अशी भीती अनेक विद्यमान नगरसेवक मनात बाळगून आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक कार्याने वॉर्डात ओळख निर्माण केलेल्यांना मात्र आपण नगरसेवक झालोच आहोत, असे वाटू लागले आहे. (प्रतिनिधी)>निवडणुकीत केवळ निवड जाहीर होणेच बाकी आहे, असा त्यांनी समज करून घेतला आहे. त्यामुळे वाहनांच्या काचेवर ‘भावी नगरसेवक ’ लिहून ते त्यांचा असा उतावीळपणा ते दाखवू लागले आहेत. निवडणुकीला सात महिन्यांचा अवधी उरला असताना ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. नगरसेवक होण्यासाठी ते उतावीळ झाले असले, तरी सात महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची योग्यता लक्षात येण्यासाठी एक प्रकारे घोडेमैदान जवळ आहे.