शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अनधिकृत ‘स्कुबा’ विरोधात समुद्रात उपोषण

By admin | Updated: December 8, 2015 00:32 IST

सायंकाळी तहसीलदारांनी देवबाग येथे स्कुबा डायव्हिंग व्यवसायिकांची बैठक घेत अधिकृत परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मालवण : तारकर्ली देवबाग समुद्रात अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या स्कुबा डायव्हिंग व्यवसायामुळे मालवण बंदरजेटी येथील अधिकृत व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनधिकृत व्यवसायामुळे पर्यटनात बेशिस्त वाढीस लागली आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे. याबाबत कारवाई न झाल्यास शासनास सहकार्य न करता समुद्र्रात पाण्याखाली उपोषण करण्याचा इशारा अधिकृत स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांनी तहसीलदार वनिता पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक व बंदर निरीक्षकांना दिला आहे. दरम्यान, तहसीलदार पाटील यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले असून अनधिकृत व्यावसायिकांवर निश्चितच कारवाई केली जाईल असे सांगितले. सायंकाळी तहसीलदारांनी देवबाग येथे स्कुबा डायव्हिंग व्यवसायिकांची बैठक घेत अधिकृत परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवार ८ डिसेंबर पासून देवबाग किनारपट्टीवर बंदर निरीक्षक तलाठी, पोलिस पाटील लक्ष ठेवणार असून अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्था मालवण यांच्यावतीने अध्यक्ष रुपेश प्रभू, सचिन गोवेकर यांनी हे निवेदन तहसीलदारांना देत तत्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी दामोदर तोडणकर, एजाज मुल्ला, जयदेव लोणे, स्वप्नील आचरेकर, सुधीर जोशी आदी व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)अधिकृत स्कुबा डायव्हिंगवर मोठा परिणाम एक खिडकी योजनेखाली मालवण बंदरजेटी येथे स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, या जलक्रीडा सेवा पर्यटकांना पुरवतो. प्रवाळाचे रक्षण करून मेरीटाईम बोर्ड, युएनडीपी यांच्या सूचनेनुसार बोट नांगरण्याची (अँकरिंग पॉर्इंट ) जागा करण्यात आली आहे. मात्र, तारकर्ली देवबाग येथे अनधिकृतपणे स्कुबा डायव्हिंग सुरु आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे सांगत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आजपासून अनधिकृत ‘स्कुबा’ बंदतहसीलदार पाटील यांनी सहाय्यक बंदर अधिकारी श्रेया कांबळी यांच्यासमवेत देवबाग येथे जात व्यावसायिकांची बैठक घेऊन अनधिकृत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले. अनधिकृत व्यवसाय सुरु राहिल्यास कारवाईचा बडगा व्यावसायिकांवर उगारला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.