पाथर्डी (अहमदनगर) : निर्घृणपणे हत्या केलेल्या दलित कुटुंबातील तिघांवर जवखेडे खालसा येथे शोकाकूल वातावरणात गुरुवारी अंत्यसंस्कार आले. मात्र घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश न आल्याने संताप व्यक्त होत आहे.गुरूवारी जाधव कुटुंबीयांचे नातेवाईक व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. सोमवारी रात्री संजय जगन्नाथ जाधव ,जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव यांची धारदार शस्त्रांनी हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहिरीत टाकण्यात आले होते. तिनही मृतदेह औरंगाबाद येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. उत्तरीय तपासणीनंतर गुरुवारी मृतदेह जवखेडे खालसा येथे आणण्यात आले. गावात मोठा फौजफाटा होता. (प्रतिनिधी) ०
दलित हत्याकांडातील तिघांवर अंत्यसंस्कार
By admin | Updated: October 24, 2014 03:56 IST