शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नातेवाईकांनी पतीच्या घरासमोर केला विवाहितेचा अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 27, 2016 19:37 IST

सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २७  : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले. बंडू शेषेराव गाडे (रा. ठाकरआडगाव ता. गेवराई) यांची मुलगी छाया हिचा विवाह चार वर्षांपूर्वी लक्ष्मण कदम याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही वर्षे सुखाची गेली; परंतु नंतर हुंड्यातील राहिलेले २५ हजार रुपये व एक तोळ्याची अंगठी घेऊन ये या कारणावरुन तिचा छळ सुरु झाला. या छळाला कंटाळून छायाने  (वय २५) सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता राहत्या विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळ माहेरकडील मंडळींनी तिने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाल्याचा आरोप करुन जिल्हा रुग्णालयातच सासरकडील मंडळींना चोप दिला. बराच वेळ गोंधळ सुुरु होता.

सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास माहेरकडीलल लोेकांनी नकार दिला. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. पती लक्ष्मण कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मयत छायाचे वडील बंडू गाडे यांच्या फिर्यादीवरुन तलवाडा ठाण्यात लक्ष्मण कदम, सासू शांता कदम, दीर भरत कदम, मोहन कदम यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सिरसदेवी येथे नेण्यात आला. माहेरचे लोक आक्रमक झाल्याने सासरकडील मंडळी पसार झाली.

दरम्यान, माहेरकडील मंडळी संतप्त होती. अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत न करता सासरकडील दारातच करण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. पोलिसांच्या उपस्थितीत छायावर मोहरकडील नातेवाईकांनी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. पती लक्ष्मण यास बुधवारी पोलिसांनी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे, असे फौजदार आर. आर. गडवे यांनी सांगितले.चिमुकली उघड्यावरमयत छायाला तीन वर्षांची श्रद्धा नावाची मुलगी आहे. तिचा पती लक्ष्मण हा शेती करतो, तसेच गावात त्याचे मोबाईल दुरुस्ती व विक्रीचे दुकान आहे. छायाच्या आत्महत्येने तिची मुलगी मातेच्या ममतेचा पारखी झाली आहे तर तिचे वडील आईच्या आत्महत्येस जबाबदार म्हणून जेरबंद झाले असून श्रद्धा उघड्यावर आली आहे.⁠⁠⁠⁠