शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षा योजनेचा निधी पडून

By admin | Updated: July 10, 2017 01:32 IST

दारिद्र्य रेषेखालील महिलांची सुरक्षित प्रसूती; तसेच माता मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने जननी सुरक्षा योजना राबवली जाते

प्रज्ञा केळकर-सिंग । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांची सुरक्षित प्रसूती; तसेच माता मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने जननी सुरक्षा योजना राबवली जाते. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील या योजनेच्या लाभार्थींचा टक्का गेल्या तीन वर्षांमध्ये घटला आहे. अपुरी कागदपत्रे, बँकेत खाते नसणे, स्थलांतरित लोकसंख्या यामुळे राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान पडून राहत आहे. गर्भवती महिलेच्या बँक खात्यात ६००० रुपये जमा केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.प्रसूतीकाळात घ्यायच्या खबरदारीबाबत जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी दर वर्षी १० जुलै हा दिवस ‘मातृ सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सरकारी योजनांना नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाकडून महानगरपालिकेला सुमारे ८० लाख रुपयांचे अनुदान मिळते. गेल्या तीन वर्षांमध्ये अपेक्षित लाभार्थींच्या एकूण संख्येपैकी १३-२० टक्के गर्भवती महिलांकडूनच या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या ८० लाख रुपयांच्या अनुदानापैकी केवळ एक ते दीड लाख रुपयांचा निधी वापरला जात असून, उर्वरित निधी धूळखात पडून आहे. घरी प्रसूती झाल्यास ५०० रुपये, शहरी भागातील रुग्णालयात प्रसूती झाल्यास ६०० रुपये, ग्रामीण भागातील रुग्णालयात प्रसूती झाल्यास ७०० रुपये, तर सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास १५०० रुपये महिलेच्या बँक खात्यात जमा केले जातात.>बँकेत खाते असणे आवश्यकजननी सुरक्षा योजनेचे अनुदान जमा करण्यासाठी गर्भवती महिलेचे बँक खाते असावे, त्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेले असावे, असे काही नियम शासनातर्फे निश्चित करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करताना स्त्रीकडील अपुरी कागदपत्रे, आधार कार्डाचा अभाव, स्वत:चे किंवा पतीशी संलग्न बँक खाते नसणे आदी कारणांमुळे लाभार्थींपर्यंत अनुदान पोहोचवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या समन्वय अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली.