शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियानाला निधीची कात्री

By admin | Updated: November 20, 2015 02:03 IST

२0१५-१६ चा निधी अप्राप्त; बांधकामाच्या संख्येतही कपात.

संतोष वानखडे/ वाशिम: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने कार्यान्वित असलेले सर्व शिक्षा अभियान सद्य स्थितीत अपुर्‍या निधीच्या कचाट्यात अडकले आहे. २0१४- १५ च्या मंजूर निधीतही ४0 टक्के ह्यबाकीह्ण ठेवून, २0१५-१६ या वर्षातील निधी अद्यापही प्राप्त झाला नाही. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याची ओरड नेहमीच होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यान्वित केले आहे. वर्गखोली बांधकाम, भौतिक सुविधा, विद्युतीकरण अशा सुविधा असणार्‍या एका वर्गखोलीवर पाच लाख ५0 हजाराची तरतूद केली जाते. प्रत्येक जिल्ह्यात ७0 ते १६0 अशा संख्येत वर्गखोलीवर खर्च केला जातो. वाशिम जिल्ह्यात २0१४-१५ या वर्षात एकूण १00 वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले असून, यावर पाच कोटी ५0 लाखाचा निधी खर्ची पडला. तसेच ८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी रॅम्प बांधण्यात आले. यावर प्रत्येकी २0 हजार रुपये असा एकूण १६ लाख ६0 हजाराचा खर्च झाला. बांधकाम व रॅम्प असा एकूण पाच कोटी ६६ लाख ६ हजाराचा निधी सर्व शिक्षा अभियानाला मिळणे क्रमप्राप्त होते. आतापर्यंत शासनाकडून पहिल्या टप्प्यात एक कोटी व दुसर्‍या टप्प्यात दोन कोटी असा एकूण तीन कोटी रुपये निधी मिळाला. अजून दोन कोटी ६६ लाखाच्या निधीची प्रतीक्षा आहे. याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे २0१५- १६ या वर्षात निधीत कपात केली असून, केवळ दोन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. शिक्षण विभागाने एकूण ७१ शाळा खोल्यांच्या बांधकामाची मागणी केली होती. २0१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यात शिक्षण विभागाला अद्याप कोणताही निधी देण्यात आला नाही. त्यामुळे वर्गखोल्यांचे बांधकाम करावे की नाही, या संभ्रमात शिक्षण विभाग अडकला आहे.