शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’चे तुकडे करणार नाही

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

चंद्रकांतदादा पाटील : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत स्पष्ट केले. ‘एफआरपी’बाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा नियोजन समिती सभेसाठी मंत्री पाटील सांगलीत आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत पाटील यांनी, एफआरपीसंदर्भात पुण्यात झालेली बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पुणे येथे शेतकरी संघटना व साखर कारखानदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. कारखानदारांना एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. त्याचे तुकडे करण्याचा प्रश्नच येत नाही. कारखानदारांनी ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात काही पर्यायही बैठकीत सुचविले आहेत. गळीत हंगामापोटी कारखानदारांना ८५ टक्के कर्ज दिले जाते. या कर्जाची मर्यादा वाढवावी. केंद्राकडून शेतकऱ्यांना थेट ४५ रुपये अनुदान मिळणार आहे. ही रक्कम एफआरपीत समाविष्ट करावी, अशा काही सूचना केल्या आहेत. त्यावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्याच्या मंत्रिपदाबाबत ते म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात सांगलीला निश्चितच संधी मिळेल. पुढील नियोजन समितीची सभा नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होईल. (प्रतिनिधी)