शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’साठी कारखान्यांना सूट!

By admin | Updated: November 26, 2015 03:21 IST

‘एफआरपी’ची (रास्त आणि किफायतशीर) रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.

कऱ्हाड : ‘एफआरपी’ची (रास्त आणि किफायतशीर) रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. सरकारचीही तशीच भूमिका आहे. मात्र, साखरेचे भाव कमी असल्याने कारखानदारांसमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून गतवर्षीप्रमाणे या वर्षीही साखर कारखानदारांना सूट देण्यात येणार असून, खरेदी कर सरकार माफ करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील होते. सहकार, जलसंधारणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी, नागरी आरोग्य, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, शेखर चरेगावकर, सदाभाऊ खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, आज पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. ऊस उत्पादितच झाला नाही तर कारखाने चालणार कसे आणि कारखान्यांपेक्षा शेतकरी महत्त्वाचे आहेत. (प्रतिनिधी )शंभर गावांमध्ये आठवडी बाजारराज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल चांगल्या दरात विकता यावा म्हणून त्यांनी आपल्या गावात शेतीमालाची साठवणूक करावी. प्रत्येक गावात शेतकरी गट निर्माण करून गावात गोडाऊन निर्माण केल्यास त्यांना शासनाकडून अनुदान दिले जाईल. यासाठी राज्यातील शंभर गावांमध्ये आठवडी बाजार सुरू करणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री पाटील यांनी केली.सातशे कोटींची मदत देणार - मुख्यमंत्रीमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात गतवर्षी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ पडला होता. तर या वर्षी १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एकीकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी उसाला एकरकमी एफआरपी मिळावा, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे कारखान्यांकडूनही अनुदानाची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही सातशे कोटी रुपयांची मदत देणार आहोत. नव्वद टक्के उसाचे एफआरपी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.