शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महापालिकेवर मोर्चा

By admin | Updated: March 7, 2017 02:30 IST

पनवेल तालुक्यातील वळवली, टेंभोडे गावातील शेकडो महिलांनी पनवेल महापालिकेवर धडक देत पाणीपुरवठा सुरळीत करा नाहीतर खुर्ची खाली करा

पनवेल : पनवेल तालुक्यातील वळवली, टेंभोडे गावातील शेकडो महिलांनी पनवेल महापालिकेवर धडक देत पाणीपुरवठा सुरळीत करा नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणा देत मोर्चा काढला होता. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर याचठिकाणी ठाण मांडून बसू असा इशारा महिलांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले व त्यांनी तातडीने दोन वेळेस त्या भागासाठी टँकर पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोकडे पाठपुरावा करून जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करतो, असे आश्वासनही त्यांनी दिले. शिवसेना विभागप्रमुख विश्वास पेटकर यांच्या नेतृत्वाखाली वळवली व टेंभोडे गावातील शेकडो महिला पाणी प्रश्नावरून आक्र मक झाल्या होत्या. त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे व बादल्या घेऊन महापालिकेचा निषेध केला. वळवली व टेंभोडे ही गावे महापालिकेच्या हद्दीत येतात. येथील ग्रामस्थ हे प्रकल्पग्रस्त असून त्यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत. मात्र सिडकोकडून सोयीसुविधा पुरविण्यात येत नाहीत. कित्येक वर्षापासून या गावांचे प्रश्न प्रलंबित असून सिडकोकडून जलवाहिनीचे काम सुरु असून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने नागरिकांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा व गावातील पाण्याची देखभाल दुरु स्ती स्वत: करून सिडकोचे थांबलेले काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी उपायुक्त मंगेश चितळे यांनी प्राथमिक स्वरु पात पाण्याचे दोन टँकर देण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देतो असे सांगितले आहे. (प्रतिनिधी)