शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीसमोर त्यांनी पोलिसांसमोर पाच हत्यार केली सुपूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 14:59 IST

भामरागड तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या नारगुंडा गावात पोलिसांच्या आवाहनानंतर नागरिकांनी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवून पोलिसांकडे गणेश मूर्तीच्या समोरच आपले पाच भरमार हत्यारे सुपूर्त केली.

रमेश मारगोनवार, ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. ८ -  भामरागड तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या नारगुंडा गावात पोलिसांच्या आवाहनानंतर नागरिकांनी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवून पोलिसांकडे गणेश मूर्तीच्या समोरच आपले पाच भरमार हत्यारही सुपूर्द केले व नक्षल्यांना मदत न करण्याचा व हत्यार न उचलण्याचा संकल्प गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी जाहीर केला. भामरागडसारख्या संवेदनशील भागात झालेली ही घटना निश्चितच मोठी नांदी म्हणावी लागेल.

गडचिरोलीपासून १८० किमी अंतरावर नारगुंडा गावात पुर्वी गावकरी व पोलीस वेगवेगळे गणपती बसवायचे. परंतु यावेळी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप मिश्रा, सीआरपीएफ ३७ बटालियनचे सहायक कमांडंट अनुपम सिंह यांनी पुढाकार घेऊन गावकरी व पोलिसांची बैठक घेतली व एक गाव, एक गणपती मांडण्याचा निर्णय घेतला. सर्व सहमतीने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रभारी अधिकारी संदीप मिश्रा व सीआरपीएफचे सहायक कमांडंट अनुपम सिंह यांनी नागरिकांना नक्षलवाद्यांना मदत करू नका, आपल्याकडे हत्यार असेल तर ते जमा करून समाजाच्या मूळ प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन केले. लागलीच या आवाहनाला प्रतिसाद देत गावकºयांनी नक्षलमुक्त गाव करण्याचा संकल्प करीत यापुढे शस्त्र न उचलण्याचा निश्चय जाहीर केला. यावेळी या कार्यक्रमाला सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक रामासिंहासन, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार चुक्कू विडपी आदी उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दलाने उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रम राबविला.