शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय समितीतून ‘मित्र’ कटाप

By admin | Updated: February 18, 2015 02:12 IST

भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

मुंबई : भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत असल्याचे समजते. बुधवारी समन्वय समितीची पहिली बैठक अपेक्षित असल्याचे समजते.भाजपा व शिवसेनेतील मतभेद वरचेवर विकोपाला जाऊ लागल्याने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र या समितीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश करण्यास भाजपा व शिवसेनेचे नेते फारसे अनुकूल नाहीत. मित्रपक्षांना समन्वय समितीत घेण्यापेक्षा भाजपा व शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणारी महामंडळे, नियुक्त्यांमध्ये मित्रपक्षांना सहभागी करून घ्यावे. मित्रपक्षांना समितीत घेतल्यास वेगवेगळ््या नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे समन्वय समितीच्या कामकाजास फाटे फुटतील , अशी भीती भाजपा नेत्यांना वाटते.दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई यांनी मंगळवारी सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. याबाबत दानवे म्हणाले की, बुधवारी समन्वय समिती घेण्याबाबत आमचा विचार सुरु आहे. या बैठकीला मित्र पक्षांना बोलवायचे किंवा कसे याबाबत चर्चा सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)