शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या वादात अटकेची ठिणगी

By admin | Updated: August 20, 2015 01:25 IST

सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय)च्या ३०-३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली/पुणे : सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय)च्या ३०-३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून पाच विद्यार्थ्यांना अटक केल्याने हा वाद चिघळला आहे. पुण्यातील या घटनेचे तीव्र पडसाद दिल्लीतील राजकीय गोटात उमटले. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सरकारविरुद्ध सोशल मीडियावरून टीकास्त्र सोडले, तर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची पाठराखण करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या वादात नव्याने उडी घेतली आहे. अटकेनंतर एफटीआयमधील विद्यार्थी विरुद्ध व्यवस्थापन यांच्यातील वाद आणखी चिघळला असून, विद्यार्थ्यांच्या अरेरावी वर्तनामुळे पोलिसांना बोलवावे लागल्याचा दावा संचालक प्रशांत पाठराबे यांनी केला; तर पाठराबे यांनीच पोलिसांना बोलावून गोंधळ घातला, असा विद्यार्थ्यांचा आरोप आाहे. या घटनेने ६८ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला निराळे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही तीव्र नाराजी नोंदविली. मोदीजी, हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा, निलंबित करा व अटक करा, हाच मोदींच्या अच्छे दिनचा मंत्र आहे, अशा ट्विटमधून राहुल यांनी सरकारवर टीका केली. देशभरातून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाने या विषयाचा अभ्यास करण्यास एस. एम. खान, अंशू सिन्हा व सी. नागनाथन अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.