शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आचरा तिठ्यावर राजकीय नेत्यांत फ्री स्टाईल

By admin | Updated: November 2, 2016 05:23 IST

राजकारणातून वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे दोन नेते गेले असता आचरा तिठ्यावर शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

आचरा : राजकारणातून वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे दोन नेते गेले असता आचरा तिठ्यावर शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद दोन दिवस धुमसत होता. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. काही स्थानिकांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न करत त्यांची समजून काढली. शेवटी दोन्ही गटाच्या नेत्यांनी आचरा पोलिस ठाणे गाठले. तडजोडीनंतर आपापसात वाद मिटवित त्यांनी घर गाठले.दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणानंतर आचऱ्यात सर्वच पक्षांमध्ये तिकीट मिळविण्यावरून धडपड चालू झाली आहे. यावरून दोन पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी परस्पर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली होती. यातूनच हा वाद सुरू झाला होता. याचे पर्यवसान सोमवारी सकाळी मारामारीत झाले.या राजकीय नेत्यांच्या हाणामारीनंतर आचरे गावात दोन पक्षांचे कार्यकर्ते भिडून हाणामारी झाल्याची अफवा आचरा येथे वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काहीकाळ आचऱ्यातील वातावरण तंग बनले होते. ही माहिती मिळताच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आचरा पोलिस ठाण्यात धाव घेत होता.दोन राजकीय गटांमध्ये गैरसमजुतीने झालेला वाद आपापसात मिटविण्यात आला असून याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे आचरा पोलिसांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)>पोलीस ठाण्यात तडजोडीने मिटविला वादहाणामारीनंतर दोन्ही पक्षांचे नेते आचरा पोलिस ठाण्यात दाखल होत परस्परविरोधी तक्रारी देण्याच्या तयारीत होते. दोन्ही पक्षांतील कार्यकर्तेही जमले होते. काही कार्यकर्ते वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेत होते. एका राजकीय पक्षाचे तालुकाप्रमुखही पोलिस ठाण्यात हजर झाले होते. वाद वाढविण्यापेक्षा आपापसात समजुतीने मिटविण्याचे दोघांमध्ये एकमत झाल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला.