शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत मिशन’बाबतच्या तक्रारींसाठी लवकरच स्वतंत्र कक्ष!

By admin | Updated: July 21, 2016 23:26 IST

जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार; राज्यस्तरावर स्वंतत्र कक्ष होणार स्थापन.

संतोष वानखडे/वाशिम स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सक्रीय सहभाग वाढविणे आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरावर असा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. निर्मल भारत अभियान हे २ ऑक्टोबर २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधकाम करणे आणि शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन या अभियानांतर्गत केले जाते. शौचालय बांधकाम झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना १२ हजार रुपयांचे अनुदानदेखील दिले जाते. अनुदान वितरणात मोठय़ा प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा व राज्य स्तरावर प्राप्त झाल्याने या तक्रारींचा निपटारा ह्यऑन दी स्पॉटह्ण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आणि लोकसहभाग वाढविणे व तक्रारींचे निराकरण करणे यासाठी २0 जुलै रोजी राज्यस्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला.***लोकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्यासोबतच स्वच्छतेच्या या अभियानाशी संबंधित योग्य तक्रारीची दखल तत्काळ घेण्याचा प्रयत्न 'व्हॉट्स अप' क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात लोकांनी शौचालय बांधूनही प्रोत्साहन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यास त्यांनी मोबाइलमध्ये शौचालयासोबत सेल्फी फोटो काढून स्वच्छ भारत मिशन जिल्हा वाशिम येथील व्हॉट्स अप क्रमांकावर टाकल्यास त्याची जिल्हा स्तरावर तात्काळ दखल घेण्यात येईल.- गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.