शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांंना मिळाले मोफत कृत्रिम अवयव

By admin | Updated: November 23, 2015 02:32 IST

कायम कुणाच्या तरी आधाराने जीवनाचा प्रवास करणाऱ्या अपंगांना रविवारी आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली.

यवतमाळ : कायम कुणाच्या तरी आधाराने जीवनाचा प्रवास करणाऱ्या अपंगांना रविवारी आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली. ‘जवाहरलाल दर्डा फाउंडेशन’ आणि ‘साधू वासवानी मिशन ट्रस्ट’च्या वतीने हे मोफत कृत्रिम हातपाय वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारंभानिमित्त येथील दर्डा मातोश्री सभागृहात रविवारी दोनशेपेक्षा अधिक अपंगांना कृत्रिम हाता-पायांचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री व ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, ‘लोकमत समाचार’ औरंगाबादचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, कृत्रिम हातपाय तज्ज्ञ डॉ. सलील जैन, साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव, सुशील ढगे उपस्थित होते.यावेळी राजेंद्र दर्डा म्हणाले, ‘अपंगांच्या जीवनात हास्य फुलले असून या सेवेमागे मानवतेची भावना आहे. बाबूजी यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र होते. यवतमाळच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले. १८ आॅक्टोबरला २२८ अपंगांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२४ अपंगांना कृत्रिम हात-पाय दिले जात आहे. शिबिरात गुडघ्याच्या वर अपंग असलेले ५५, गुडघ्याच्या खाली अपंग असलेले ९५ आणि अन्य ५५ अपंगांना हात बसविण्यात येत आहेत.’सुशील ढगे म्हणाले, ‘मिशनच्या माध्यमातून २००७पासून राज्यातच नव्हेतर देशभरात कृत्रिम हात-पाय बसविण्याचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत १८ हजार लोकांना मोफत हात-पाय बसवून देण्यात आले. यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृत्रिम हात-पाय तज्ज्ञ आणि साधू वासवानी मिशनच्या तंत्रज्ञांचा या वेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)